पान:डी व्हँलरा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ | डी व्हॅलेरा। हैं नये अशी डी व्हॅलेराची मंडळी खबरदारी घेत असत. या मुलाखती बहुतकरून सूर्यास्तानंतर होत असत; व आपण कोणत्या प्रदेशांत आहोत हे बातमीदाराला कळत नसे, इतकेच नव्हे, तर ज्या इमारतींत मुलाखत होई तिचे बाह्य स्वरूपदेखील त्याच्या दृष्टीस पडत नसे. * डेली क्रॉनिकल' पत्राचा बातमीदार ए. इ. कॉपिंग याने यासंबंधी असे वर्णन केले होते, की त्या वेळीं मध्यरात्र झाली होती. जिकडे . तिकडे गडद अंधकार पडला होता. मला एका मोटारींत बसविण्यांत आले, व ती अतिशय वेगाने चालू लागली. शेवटीं ती एका ठिकाणी थांबली व मला डी व्हॅलेरासमोर नेण्यांत आलें. डी व्हॅलेरा बोलाचालायला फारच आनंदी वृत्तीचा आहे. त्याचे नेहमींचे फोटो आपण पाहतों त्यांत त्याची मुद्रा विशेष आकर्षक दिसत नाही. पण त्याला प्रत्यक्ष पाहतांच हे मत पार बदलून जाते. कामाची दगदग आणि हालअपेष्टा यांमुळे त्याचा चेहरा जरा विकृत झाला आहे. तथापि तो बोलू लागला म्हणजे त्याच्या डोळ्यांत कांहीं विशेषच चमक दिसू लागते, आणि त्याच्या तोंडाभोंवतीं हास्याच्या लहरी खेळू लागतात. सरकारने सर्व सिन फेन लोक सोडून दिले तेव्हां यापुढे अज्ञातचासांत राहण्याची गरज नाहीं असे डी व्हॅलेराला वाटले. त्याला सरकार पुन्हा पकडील हे शक्य नव्हते. कारण सरकारला दडपशाहीची कितीही हौस असली तरी या वेळीं सिन फेन पक्षाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारण्यापेक्षा जरा बेतानेच घेण्यांत फायदा आहे हे सरकार जाणून होते. हा सर्व विचार करून डी व्हॅलेरा प्रगट झाला. १९१८ च्या डिसेंबर महिन्यांत जी निवडणूक झाली त्यांत ईस्ट क्लेअर व ईस्ट मेयो या दोन भागांतर्फे लोकांनी त्याची निवडणूक केली होती. या निवडणुकीत मवाळ पक्षाचे अध्वर्यु जॉन डिलन हे डी व्हॅलेराचे प्रतिस्पर्धि होते. पण त्यांना डी व्हॅलेरापेक्षा ४४६१ मतें कमी पडली. मवाळ पक्षाचा या निवडणुकीत इतका पराभव झाला,