पान:डी व्हँलरा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मस्तवाल मुत्सद्यांना शह ४५. तर फारच कसून तपासणी करण्यांत आली. पण त्या गव्हर्नरला किंवा सरकारला डी व्हॅलेराचा शोध कांहीं केल्या लागला नाही. त्या * उंच, सडपातळ, आणि पाणीदार पिंगट डोळ्यांच्या इसमा 'चा मागमूस सांपडेना. डी व्हॅलेराच्या शोधाच्या कामीं पराभूत झाल्यावर सरकारने आपला पराभव औदार्याच्या पांघरूणाखालीं छपविण्याचा प्रयत्न केला. डी व्हॅलेरा सुटला तर सुटला, नाहीं तरी आम्ही त्याला थोड्याच दिवसांनीं सोडून देणार होतो, असे लोकांना भासविण्यासाठी सरकारने सान्या सिन फेन लोकांना तुरुंगांतून सोडून दिले. कारागृहांतून स्वतःची मुक्तता करून घेतल्यावर डी व्हॅलेराने कांहीं दिवस मौनव्रत स्वीकारले होते. पण नंतर त्याने ते मौन सोडले व आयरिश जनतेला एक संदेश पाठविला. हा संदेश एका जाहीर सभेत फादर ओलॅनागन यांनी वाचून दाखविला. * देशाचे कार्य करण्यासाठीच मी तुरुंगांतून बाहेर आलो आहे व ते मी करीत आहे ? येवढाच तो संदेश होता. पुढे काही दिवसांनी डी व्हॅलेराबरोबरच निसटलेला सीन मॅक्गरी हा मॅन्शन हाऊसमध्ये झालेल्या एका जलशाचे प्रसंगी स्वयंसेवकांच्या खड्या पाहन्यांत एकाएकी आलेला व अकस्मात् नाहींसा झालेला लोकांनी पाहिला. तेव्हा त्यावरून आपला परमप्रिय पुढारी डी व्हॅलेराही आयलंडमध्ये सुखरूप येऊन पोचला असला पाहिजे असा लोकांनीं तर्क केला. नंतर हळू हळू वृत्तपत्रांच्या बातमीदारांनी डी व्हॅलेराच्या मुद्दाम घेतलेल्या मुलाखती प्रसिद्ध व्हावयास लागल्या. सरकारच्या निष्णात गुप्त पोलिसांनाही डी व्हॅलेराचा ठावठिकाण लागू नये, आणि अमेरिकन, फ्रेंच व इंग्लिश पत्रांच्या बातमीदारांना त्याच्या मुलाखतीदेखील घेतां याव्या ही केवढी आश्चर्याची गोष्ट होय ? सिन फेन पक्षांत त्या वेळी किती शिस्त होती हैं या गोष्टीवरून चांगले दिसून येते. अर्थात् बातमीदारांना डी व्हॅलेराच्या मुलाखती मिळाल्या तरी तो कोठे आहे याविषयी त्यांना 'काडीमात्रही अंदाज करता येऊ