पान:डी व्हँलरा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•४४ डी व्हॅलेरा। सहाय्याने तुरुंगाचे मागील दार उघडून जेव्हां डी व्हॅलेरा बाहेर पडला तेव्हां क्षणार्धाचाही विलंब न करता ते तिघेही पूर्वी ठरलेल्या जागी मोटारींतून निघून गेले. | डी व्हॅलेराच्या या साहसाची बातमी कळतांच ते साहस त्याने कसे केले हे समजून घेण्यास व सध्यां तो कोठे आहे व काय करतो आहे त्याची बातमी मिळविण्यास सारे वृत्तपत्रकार अधीर झाले. एका फ्रेंच । वृत्तपत्राने प्रसिद्ध केले, कीं डी व्हॅलेरा हॉलंडच्या मार्गाने फ्रान्समध्ये आला असून तो सध्यां पॅरिस शहरी आहे. एका इंग्लिश पत्राने असे छापलें, की प्रेसिडेंट वुइल्सन यांस भेटण्यासाठी डी व्हॅलेरा अमेरिकेस गेला आहे. उलट ‘डेली क्रॉनिकल' पत्राने डब्लिन येथील एका पकडापकडीची बातमी छापून असे म्हटले होते, की डी व्हॅलेरा सध्यां । डब्लिनच्या आसपास असल्यामुळे तो सांपडेल या आशेनेच सरकारने ही धरपकड केली. अशा प्रकारे जो तो वृत्तपत्रकार आपली कल्पनाशक्ति चालवून डी व्हॅलेराविषयींच्या विश्वसनीय बातम्या छापीत होता. अवघ्या चार दिवसांच्या अवधींत एकमेकांपासून हजारों मैलांच्या अंतरावर असलेल्या निरनिराळ्या शहरांत डी व्हॅलेरास प्रत्यक्ष पाहिल्याबद्दलच्या खास बातमीदारांच्या या ‘विश्वसनीय' बातम्या किती विश्वसनीय होत्या हे काय अधिक सांगावयास पाहिजे ? सान्या जगाचे लक्ष इतक्या उत्कंठेनें डी व्हॅलेराकडे लागलेले होते. अशा वेळी त्याला पुन्हां पकडण्यासाठी सरकार शिकस्तीचे प्रयत्न करून पहात होते. गुप्त पोलिसांचा तांडाच्या तांडा या कामी लावण्यांत आला होता. इंग्लंडमधून बाहेर पडण्याचा जो जो म्हणून संभवनीय मार्ग होता त्याच्यावर पराकाष्ठेचा जागता पहरा ठेवण्यांत आला होता. कदाचित् डी व्हॅलेरा अजून लिंकन शहरांतच असेल अशी तुरुंगाच्या गव्हर्नरला शंका आल्यावरून त्याने शहरांतील प्रत्येक घराची झडती घेतली. शहरांत जे आयरिश लोक होते त्यांच्या घरांचं