पान:डी व्हँलरा.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मस्तवाल मुत्सद्यांना शह ४३ होता त्या तुरुंगावर सरकारने अतिशय कडक पाहरा ठेवला होता. नऊ महिनेपर्यंत इष्टमित्रांनाच नव्हे तर डी व्हॅलेराच्या पत्नीला देखील त्याला येऊन भेटण्याची परवानगी नव्हती. इतका सक्त बंदोबस्त असूनही डी व्हॅलेराने आपली सुटका करून घेतली. प्रथम अनेक युक्त्या योजून तुरुंगाच्या दाराला जे कुलूप असे • त्याच्या किल्लीचा ठसा मेणावर उठवून घेण्याचे काम डी व्हॅलेराने साधून घेतले. या वेळी आपल्या इष्टमित्रांस विनोदी चित्रे पाठविण्याची तुरुंगांतील लोकांस परवानगी होती. या परवानगीचा फायदा घेण्याचे . डी व्हॅलेरामें ठरविले, व त्याप्रमाणे त्याने दोन कार्डवर दोन चित्रे काढलीं. एका चित्रांत असे दाखविले होते, की दारूने झिंगलेला एक इसम एका कुलुपांत किल्ली घालण्याचा प्रयत्न करीत आहे. * माझा आंत शिरकाव होत नाही' असे त्या चित्राखाली लिहिले होते. दुस-या चित्रांत एक इसम तुरुंगाच्या कुलुपाला एक किल्ली चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दाखवून त्या चित्राच्या डोक्यावर * माझी सुटका होत नाहीं' असे लिहिले होते ती दोन्ही कार्ड तुरुंगाच्या अधिका-यांच्या तपासणीसाठी गेली तेव्हां त्या चित्रांच्या विनोदांतच ते गर्क झाले, त्यांत कांहीं विशिष्ट गूढार्थ असेल अशी त्यांना शंकाही आली नाहीं, व ती त्यांनीं पास करून डी व्हॅलेराच्या स्नेह्यांकडे जाऊ दिली. डी व्हॅलेराने चित्रांत जी किल्ली काढली होती ती तुरुंगाच्या ख-या किल्लीची हुबेहूब प्रतिमा होती, व ती चित्रे हातीं येतांच डी व्हॅलेराच्या मित्रांनी त्याच्या मनांतून त्या चित्रांच्या द्वारे कोणता संदेश सूचित करावयाचा होता ते ताबडतोब ओळखले. त्यांनी ताबडतोब चित्रांतील किल्लीबरहुकूम एक किल्ली बनवून घेतली व ती एका केकमध्ये घालून डी व्हॅलेराकडे पाठवून दिली. ठरलेल्या वेळीं मिशेल कॉलिन्स व हॅरी बोलंड हे दोघे मोटार घेऊन जय्यत तयारीने उभे होते, आणि मित्रांकडून आलेल्या किल्लीच्या