पान:डी व्हँलरा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० डी व्हॅलेरा पण याचे स्नेही वे चाहते स्तब्ध बसले नाहींत. सरकारचा खलिता प्रसिद्ध होताच त्यांनी एक जाहिरपत्रक काढले व सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला. | पकडल्यानंतर डी व्हॅलेरा यास फ्रॉगॉच येथील तुरुंगांत रवाना करण्यांत आले. डी व्हलेराची याप्रमाणे उचलबांगडी केल्यानंतर लष्कर भरतीचा प्रश्न पुनः हाती घेण्यास आपल्याला मोकळीक आहे असे सरकारला वाटले. पण आतां लष्कर भरतीची भाषा बोलतांना सक्ती हा शब्द वगळून आपखुषीची भरती अशी भाषा वापरण्याचा सरकारने उपक्रम आरंभिला. आयलंडमध्ये खुषीची लष्कर भरती यशस्वी झाली नाहीं तर मग आम्ही सक्तीच्या कायद्याचा अंमल सुरू करू असे सरकार म्हणू लागले. पण खुषीची भरती ही केवळ वरून बोलण्याची भाषा होती. वास्तविक सरकारने सक्तीच्या भरतीलाच प्रारंभ केला होता. शिवाय ‘खुषी'च्या भरतीची मोहीम सुरू असतांना लोकांचे भाषणस्वातंत्र्य सरकारने हिरावून घेतलें, सभाबंदीचे हुकूम काढले, आणि भरतीविरुद्ध कोणी अवाक्षर काढले, की त्याला पकडून तुरुंगांत टाकण्याचा सपाटा चालविला. पण सरकारची ही दडपशाही निष्फल ठरली. आयर्लंडच्या तरुणांना डी व्हॅलेराने चांगली शिकवणूक देऊन ठेवलेली होती. सरकारने ५०००० रिक्रूटांची मागणी केली होती. पण पुरे ५० रिक्रूटही सरकारला मिळेनात. ब्रिटिश सैन्यांत दाखल होण्याऐवजी आयरिश स्वयंसेवकांच्या पथकांत शेकडों लोकांनी नांवे दाखल केली, आणि सरकारला पैशाची मदत मिळण्याचे लांबच राहून हजारों पौंडांचा फंड देशकार्यासाठी जमू लागला. रोजच्या रोज लोकांची मने भरतीच्या प्रश्नाविरुद्ध अधिकच भडकू लागलीं, व सरकारचे व आयरिश जनतेचे आतां चांगलेच दोन हात होणार अशी स्पष्ट चिन्हें दिसू लागली. त्या झगड्याचा परिणाम काय झाला असता ते सांगणे कठीण