पान:डी व्हँलरा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१८ सालची झटापट ४१ आहे. पण तो झगडा होऊच नये असा ईश्वरी संकेत असल्यामुळे तो प्रसंग अजीबात टळला. कारण त्या प्रसंगाचे मूळ कारणच नष्ट झाले. १२ आक्टोबर रोजी जर्मनीने प्रेसिडेंट वुइल्सन यांच्या चवदा तत्त्वांस मान्यता दिली, ९ नोव्हेंबर रोजी कायसरने राजपद सोडले, आणि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुटलेला तोफेचा गोळा महायुद्धांतील शेवटचाच गोळा ठरला ! | याप्रमाणे महायुद्धच अकस्मात् तहकूब झाल्यामुळे भरतीचा प्रश्नही आपोआपच नष्ट झाला. पण तो नाहींसा झाला तर दुसरा एक तितक्याच महत्त्वाचा प्रश्न पुढे आला. डिसेंबर महिन्यांतील सार्वत्रिक निवडणुकी हाच तो प्रश्न होय. या निवडणुकीत लोकांनी सिन फेन पुढग्यांना इतक्या दणदणीत मताधिक्याने निवडून दिले, कीं सारा आयलंड देश सिन फेन असल्याबद्दल आतां संशयाला यत्किंचितही अवकाश राहिला नाहीं. ग्रे स्टोन्स येथे पकडून डी व्हॅलेराला सरकारी लोक घाईघाईने नेत होते त्या वेळी त्याने शांत रहा आणि विश्वास सोडू नका !' येवढाच संदेश लोकांना सांगितला होता. या त्याच्या संदेशाप्रमाणेच त्याच्या अनुयायांनी वर्तन ठेवले असे या निवडणुकीवरून दिसून आले. ही निवडणूक पार पाडल्यानंतर डी व्हॅलेराला सरकारने बंधमुक्त करावे अशी आयरिश लोकांनी जोराची मागणी सुरू केली. १७ जानेवारी १९१९ या एकाच दिवशीं सान्या आयलंडांत ठिकठिकाणी मिळून शेंकडों सभा झाल्या, व प्रत्येक सभेत डी व्हॅलेराच्या सुटकेविषयी ठराव करण्यांत आले. सरकार डी व्हॅलेराला सोडील असा मुळींच रंग दिसेना. पण लोक निकराची मागणी करीत आहेत व सरकार आपला हेका सोडत नाहीं असा प्रकार इकडे आयलंडमध्ये चालू असतांना तिकडे लिंकनच्या तुरुंगांत डी व्हॅलेराने आपल्या सुटकेचा प्रश्न आपण स्वतःच सोडविला; आणि डी व्हॅलेरा तुरुंगांतून निसटल्याची बातमी ३ फेब्रुवारी रोजी आली तेव्हां आयरिश जनतेच्या आनंदाला पारावार राहिला नाहीं !