पान:डी व्हँलरा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९, ई १९१८ सालची झटापट ण्यांत आले. आर्थर ग्रिफिथ, काउंट प्लंकेट, माव्हिक्झ बाई वगैरे कित्येक मंडळींची धरपकडही त्याच रात्री झाली. 'जर्मन कटा'चे नाटक करून डी व्हॅलेराला पकडण्यांत सरकारला एका दगडाने दोन पक्षी मारावयाचे होते. एक तर दोस्त राष्ट्रांपुढे आयर्लंडची वेअब्रू करावयाची, आणि शिवाय डी व्हॅलरा व त्याचे साथीदार यांना तुरुंगात डांबून टाकून लष्करभरतीचा मार्ग निष्कंटक करावयाचा, असा दुहेरी कावा सरकारला साधावयाचा होता. डी लेराला पकडण्यांत आपण कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही असे दाखविण्याचे सरकारने शक्य तेवढे प्रयत्न केले. डी व्हॅलेराला पकडल्याबद्दल इंग्लंडची प्रजा रागावण्याचा संभव होता असे नव्हे, किंवा आयर्लंडचे लोकमत खवळले तरी त्याबद्दल सरकारला मोठीशी पर्वा होती असेही नव्हे. पण तो काळ असा होता, की अमेरिकेची म संभाळण्यासाठी इंग्लंडच्या मुत्सद्यांची धडपड चाललेली होती, व अमेरिकेचा आपल्यावर राग होऊ नये म्हणूनच डी व्हलेराच्या धरपकडीचे समर्थन करण्याचे श्रम इंग्रज मुत्सद्दी घेत होते. डी व्हॅलेरा वगैरे पुढारी जर्मन कटांत सामील असल्याबद्दलचा कोणकोणता पुरावा आपल्याजवळ आहे ते जाहीर करण्यासाठी सरकारने एक खास खलिता प्रसिद्ध केला. । या खलित्यांत ख-याबरोबर खोट्याचीही मोठ्या हातचलाखीने सरमिसळ करण्यांत आली होती. सरकारची ही सारी कैफियत लबाडीची आहे हे लोकांनी केव्हांच ओळखले होते. तशांत लॉर्ड बिंबोन यांनी जेव्हां असे जाहीर केले, की थोड्याच दिवसांपूर्वी मी व्हाइसरॉय असतांना मला या कटाचा मागमूसही कोठे दिसला नाहीं, तेव्हां तर लोकांना सरकारचे कारस्थान पुरतेच उमगले. तो खलिता प्रसिद्ध झाला तेव्हां डी व्हॅलेरा कैदेत असल्यामुळे आपल्यावर करण्यांत । आलेल्या खोट्यानाच्या आरोपांचे निराकरण करणे त्याला शक्य नव्हते.