पान:डी व्हँलरा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ | डी व्हॅलेरा, व्यक्त करीत असत. त्याने जे कार्य हाती घेतले होते ते लोकांच्या जिव्हाळ्याचे होते, व ज्या कुशलतेने आणि धडाडीने तो ते पार पाडीत होता ती धडाडी व कुशलता पाहून लहान, थोर, सर्व मंडळीस तो परमप्रिय वाटू लागला होता. || डी व्हॅलेराची शक्ति दिवसेंदिवस वाढत आहे व आतां दिरंगाई केली तर गोष्टी आवाक्याबाहेर जातील, अशी आतां सरकारची खात्री पटली. पण अमेरिका व बहुतेक वसाहती यांची आयलंडविषयी सहानुभूति होती, आणि कांहीं तरी सबळ कारण दाखविल्याखेरीज डी व्हॅलेराला पकडल्यास त्या देशाच्या व आपल्या मैत्रींत वितुष्ट येईल हे इंग्रज मुत्सद्दी पूर्णपणे ओळखून होते. म्हणून डी व्हॅलेराने जर्मनीशीं गुप्त कारस्थान करून आयलंडमध्ये बंड उभारण्याचा कट केला आहे असा ओरडा करण्याचे सरकारने ठरविले. या बेताप्रमाणें अवश्यक तेवढी सर्व तयारी केल्यानंतर सरकारनें “जर्मन कटा'चे हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा निश्चय केला, व ता. १८ मे १९१८ रोजी आयर्लंडचे नवे बडे लाटसाहेब लॉर्ड फ्रेंच व चीफ सेक्रेटरी शॉर्ट यांनी एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहिरनाम्यांत म्हटले होते, की कांहीं आयरिश लोकांनी जर्मनीशीं गुप्त व्यवहार ठेवून राजद्रोह केल्याचे सरकारच्या नजरेस आल्यावरून, आणि जर्मन कटा'ची अत्यंत खात्रीलायक बातमी सरकारच्या हाती आल्यावरून हा कट नाहींसा करण्यासाठी जोराचे धोरण स्वीकारण्याचे सरकारने ठरविले आहे, छः या कामीं प्रत्येक राजनिष्ठ प्रजाजन सरकारला सर्व प्रकारे मदत करील असा सरकारला दृढ भरंवसा आहे. १ हा जाहिरनामा प्रसिद्ध झाला त्याच्या आदल्याच रात्रीं डब्लिन, येथे आणि इतर शहरीं सांपडले तेवढे सिन फेन पुढारी एकाएक पकडण्यात आले. डब्लिनकडून येणा-या आगगाडींतून ग्रे स्टोन्स येथे डी व्हॅलेरा रात्री सव्वा दहा वाजतां उतरला व त्याबरोबर त्यास पकड