पान:डी व्हँलरा.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ १९१८ सालची झटापट असे आमचे ठाम मत आहे, आणि ती भरती हरएक प्रकारच्या उपायांनी बंद पाडण्यासाठी एकमेकांस मनोभावाने झटून मदत करण्याची आम्हीं ईश्वराच्या पवित्र नांवाने प्रतिज्ञा करीत आहोत. या जाहिरनाम्यामुळे सरकारच्या कंप्त खूपच धांदल उडाली, व आतां काय करावे याविषयीं जोराची खलबतें सुरू झाली. उलट, आयरिश लोकांचा धीर या जाहिरनाम्यामुळे शतपट वाढला, आपले सामर्थ्य दुणावल्यासारखे त्यांना वाटू लागले, व आपण झटापट केली तर त्यांत ईश्वर आपली पाठ राखील अशी श्रद्धा त्यांच्या अंत:करणांत उत्पन्न झाली. लोकांचा हा वर्धिष्णु उत्साह डी व्हॅलेराने ओळखला. मॅन्शन हाऊस कॉन्फरन्समध्ये कांहींही ठरो, आपण आपले काम स्वतंत्र रीतीने केले पाहिजे असा त्याने विचार केला. स्वयंसेवकांच्या अधिका-यांना बोलावून, त्यांच्याशीं खलबतें करून हरएक प्रकारच्या योजना त्याने तयार केल्या. मॅन्शन हाऊस कॉन्फरन्समध्ये एकमताने एखादी योजना निश्चित झाली तर तिचा फार फायदा होईल हे त्याला समजत नव्हते असे नव्हे. पण देशाचा खरा शेवटचा आधार आयरिश स्वयंसेवक व त्यांचे अधिकारी हेच होत हे विसरून चालावयाचे नाहीं असे त्याचे मत होते, आणि वस्तुतः तेच खरे होते. या आपल्या मताप्रमाणे त्याने सर्व प्रकारची तयारी सुरू केली. शेंकडों कामें उरकण्यांत तो या वेळी इतका गुंतला होता, की एका सेकंदाचेही रिकामपण त्याला नव्हते. सान्या देशाचे लक्ष या वेळी त्याच्याकडे लागून राहिले होते. राजकरणाचा खरा सूत्रधार आतां तोच होता, व तो काय करतो व आपला डाव कसा मांडतो हे प्रत्येकजण अतिशय उत्कंठेने पहात होता. मॅन्शन हाऊसमध्ये डी व्हॅलेराची कचेरी। असल्यामुळे तेथे लोकांचे थवेच्या थवे अहोरात्र उभे रहात असत, च डी व्हॅलेरा कचेरीतून बाहेर पडला किंवा बाहेरून येऊन कचेरीत शरला, की लोक मोठ्याने जयघोष करून त्याच्यावरची आपली भक्ति