पान:डी व्हँलरा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ डी व्हॅलेरा प्रतिकाराची चळवळ करावयाची तिच्यामध्ये देशांतील सर्व पक्ष सामील होणे हितावह होईल हे जाणून त्या चळवळीचे धोरण ठरविण्यासाठी निरनिराळ्या मतांच्या पुढ-यांची एक सभा डी व्हॅलेराने बोलाविली. सरकारचे सर्व राजकारण ज्याप्रमाणे डब्लिन कॅसमध्ये शिजत असे, त्याप्रमाणे सिन फेन पक्षाचीं सारीं खलबते मॅन्शन हाऊस येथे होत असत. या ठिकाणींच डी व्हॅलेराने बोलावलेली सभा ८ एप्रिल रोजी भरली. सिन फेन पक्ष, जुना आयरिश मवाळ पक्ष, स्वतंत्र मतवादी पक्ष, आणि मजूर पक्ष या सर्वांनी आपापले प्रतिनिधि या सभेस. पाठविले होते. अशा प्रकारे या सभेला प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे सक्तीच्या भरतीविरुद्ध कोणत्या प्रकारची चळवळ करावी याविषयी. या सभेत कांहीं तरी सर्वसंमत धोरण निश्चित होईल अशी लोकांना बरीच आशा वाटू लागली. ही आशा अधिकच बळावण्यासारखी एक गोष्ट सभेच्या बैठकीस प्रारंभ झाल्यानंतर लवकरच घडून आली, व ती ही की त्याच सुमारास मेनूथ येथे भरलेल्या धर्मगुरूंच्या सभेकडे जाऊन सक्तीच्या भरतीच्या बाबतीत त्यांचे काय मत आहे ते समजून घेण्यासाठी मॅन्शन हाऊस कॉन्फरन्सतर्फे डी व्हॅलेराला पाठविण्यांत आले. धर्मगुरूंच्या सभेत गेल्यावर डी व्हॅलेराने आपले विचार इतक्या उत्कृष्ट रीतीने त्यांजपुढे मांडले, की त्याच्या अंगच्या चिकित्सक बुद्धीचे, देशाभिमानाचे, आणि धिटाईच्या मुत्सद्दी बाण्याचे सर्व धर्मगुरूंना अत्यंत कौतुक वाटले. आयरिश लोक सक्तीच्या भरतीला विरोध करणार, ही अपेक्षा सरकारने केलेलीच होती हे खरे, पण डी व्हॅलेराशीं विचारविनिमय केल्यानंतर ज्या प्रकारचा जाहिरनामा धर्मगुरूंनी काढला; तसला जाहिरनामा ते काढतील असे सरकारच्या स्वप्नीदेखील कधीं आल नव्हते. त्यामुळे तो जाहिनामा पाहून सरकार चपापलें. जाहिरनाम्यांत धर्मगुरूंनी स्पष्टपणे म्हटले होते, कीं, ६ या देशांत सक्तीची लष्कर भरती सुरू करण्याचा इंग्रज सरकारला कोणत्याही प्रकारचा हक्क नाही