पान:डी व्हँलरा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१८ सालची झटापट ३५ लोकांनाच नव्हे तर, त्या सभासदांना देखील पुरते उमजले. वास्तविक महायुद्धाच्या वेळी सरकारच्या मार्गात कोणतीही अडचण नसावी म्हणून पूर्वी आयरिश सभासदांनीं अनुकूल मते दिली होती. पण आज त्या अनुकूल मतांचा अशा रीतीने फायदा घेऊन आयर्लंडवर कुरघोडी करण्यास लॉइड जॉर्ज तयार झालेले पाहून त्यांना विस्मय वाटला व संतापही आला. सिन फेन पक्षाचा शहाणपणा आतां सर्व लोकांना पूर्णपणे पटला. पार्लमेंटमध्ये सभासद पाठविणे हे केवळ निष्फळच नव्हे तर धोक्याचे आहे असे कट्टे पार्लमेंटवादी लोकसुद्धा आतां म्हणू लागले. अशा प्रकारची जागृति जिकडे तिकडे झाल्यामुळे लॉइड जॉर्जचा सक्तीच्या भरतीचा जाहिरनामा बाहेर पडल्यापासून सारे लोक सिन फेन पक्षाला येऊन मिळू लागले. इंग्लंडने सक्तीची लष्कर भरती सुरू केली तर आपण काय करावयाचे ते डी व्हॅलेराने आपल्या मनाशी कायम ठरवून ठेवले होते, व न डगमगतां त्याप्रमाणे वागण्याचा त्याचा निश्चय होता. एका जाहीर भाषणांत तो म्हणाला, कीं ** आयर्लंडच्या जन्मसिद्ध हक्कांची इंग्लंडने कशी पायमल्ली चालविली आहे त्याचे सक्तीची लष्करभरती हे एक नवे उदाहरण आहे. या पायमल्लीविरुद्धच आम्ही आजपर्यंत झगडत आलो. आमचे कार्य न्यायाचे आणि धर्माचे आहे असा आम्हांस दृढ विश्वास असल्यामुळे अगदी शांत चित्ताने आम्ही या भरतीच्या कायद्याविरुद्ध झगडूं. | डी व्हॅलेराच्या या उद्गारांत व्यर्थ धमकी देण्याची छटा नव्हती. किंवा आपला दिमाख दाखविण्याचीही लकेर नव्हती. ते उद्गार अगदीं साधेसुधे होते. पण त्या साध्या उद्गारांमागे निश्चयाचे उग्र स्वरूप स्पष्ट दिसत असल्यामुळे सहस्रावधि सैनिकांच्या हातांतील नागच्या समशेरी पाहूनही जी दहशत सरकारच्या अंत:करणांत उत्पन्न झाली नसती ती त्या चार शब्दांनी उत्पन्न केली. सरकारने आयर्लंडमध्ये सक्तीच्या भरतीला प्रारंभ केल्यास जी