पान:डी व्हँलरा.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ १९१८ सालची झटापट होमरूल देण्याचा मनःपूर्वक संकल्प असेल, तर असली नाटके न करतां ते देता येईल. कन्व्हेन्शन मोडण्याची आमची इच्छा नाहीं. इंग्लंडच्याच मनांतून ती उधळून लावून उलट बोंब मारावयाची आहे. कन्व्हेन्शनमुळे राष्ट्राचा कांहीं फायदा झाला तर तो आम्ही पदरांत पाडून घेऊ, तो आम्ही रस्त्यावर फेकणार नाहीं; पण इतकें मात्र सांगून ठेवतो, कीं तेवढ्याने संतुष्ट होऊन आम्ही आपली चळवळ थांबवू अशी कोणाची कल्पना असेल तर ती सपशेल चुकीची ठरेल. आमचे देणे इंग्लंडने पुरते चुकते केले पाहिजे. त्यांतील बारकासा हप्ता आज आम्हांला दिला तरी ते पैन् पै फिटेपर्यंत आमचा तगादा कायम राहणार. आमच्या जिवांत जीव आहे तोपर्यंत शिकस्त करून आम्ही झगडा चालविणार. चतकोर भाकरीचा तुकडा पदरांत पडावा म्हणून आमच्या जन्मसिद्ध हक्कांचा आम्ही कधीही विक्रय करणार नाही, आमच्या आयुष्यांत आम्हांला कार्यसिद्धि करता आली नाही तर आमच्या मागून येणारी पिढी आमचे निशाण हातात घेऊन लढत राहील !!! । डी व्हॅलेराची व इंग्रज सरकारची अशा प्रकारे झटापट चालू असतांनाच १९१८ साल उजाडलें, व त्या वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर अल्पावधीतच एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवून इंग्लंडचे व आयलंडचे भांडण विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली. तो प्रश्न म्हणजे सक्तीच्या लष्करभरतीचा कायदा इंग्लंडप्रमाणेच आयर्लंडलाही लागू करण्यासंबंधींचा होय. कॉमन्सच्या सभेत ‘टोरी' पक्षाची जी मंडळी होती त्यांनी तो कायदा आयलंडला लागू करण्याबद्दल सरकारच्या पाठीमागे सारखें टुमणे लावले होते. पण तो कायदा लागू केल्यास आयरिश लोक खवळून जातील व मग त्यांच्याशी विलक्षण जोराची झटापट करावी लागेल, या भीतीने सरकार कचरत होते, व म्हणून त्या प्रश्नाचा विचार दिवसानुदिवस लांबणीवर टाकण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. आणि सरकार कचरत होते ते सकारणच होते. डी...३