पान:डी व्हँलरा.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ डी व्हॅलेरा सरकारला मदत करीत होते. डी व्हॅलेरावर अनेक प्रकारच्या आरोपांचा आणि शिव्याशापांचा वर्षाव होत होता. पण त्यामुळे डी व्हॅलेराच्या शांततेचा भंग झाला नाहीं, किंवा त्याचे चित्तही लेवमात्रदेखील चळलें नाहीं. २४ नोव्हेंबर रोजी मॅन्शन हाऊस येथे भरलेल्या सभेत आपल्या टीकाकारांना उत्तर देण्याच्या उद्देशाने तो म्हणाला, 'पूर्वी अनेक वेळां मी जे बोलून दाखविलें तेच आजही पुन्हां सांगतो, कीं लहान राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता इंग्लंड खरोखरच या महायुद्धांत पडले असेल तर आयर्लंडला संपूर्ण खराज्य देऊन टाकून ते त्यांनी खरे करून दाखवावे. आयर्लंड म्हणजे एक डांबिस लोकांचा देश आहे असे फ्रान्सला दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण फ्रान्सला आयरिश लोक कसे आहेत ते माहीत आहे. आमचे आणि फ्रान्सचे मुळीच भांडण नाहीं. शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने आणि दडपशाहीच्या दर्पोक्तीने आम्ही दबकू असे सरकारला वाटते की काय ? आम्ही कशालाच भिणार नाही. आमच्या प्रयत्नांना कोणतीच मर्यादा माहीत नाही. फक्त नैतिक तत्त्वांचे बंधन आम्ही जाणतों व त्यांचे उल्लंघन मात्र आम्ही कधी करणार नाहीं. नैतिक व धार्मिक तत्त्वें पायाखाली तुडवून मारण्यापेक्षां मरणच आम्ही आनंदाने पतकरूं. लॉइड जॉर्जने ज्या कन्व्हेन्शनचा उपक्रम केला ती मोडून टाकण्यासाठी आम्ही पुढे सरसावल आहोत, असे आमचे टीकाकार म्हणतात. पण आमचे उत्तर असे आहे, की आम्हांला मोडून टाकावयाची अशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे इंग्लंडशीं असलेला आमचा संबंघ. कन्व्हेन्शन भरविण्याची वाटाघाट सुरू झाली तेव्हांच आम्ही सा-या लोकांना बजावून सांगितले, की बाबांनों, हा ‘घुशीचा सांपळा' आहे, कोळ्याने पसरलेले हे जाळे आहे, यांत तुम्ही सांपड्डू नका. इंग्लंडच्या मनांत आम्हांला होमरूल द्यावयाचेच असेल तर त्याला कन्व्हेन्शनसारखे सोहाळे काय करावयाचे आहेत ?