पान:डी व्हँलरा.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१८ सालची झटापट ३१ कारच्या मनांत दुस-या कोणी भरून द्यावयास पाहिजे होती असे नव्हे. सरकार त्याला पकडावयासाठी इतकें टपलेले होते, की त्याच्यासाठी एक अंधार कोठडी सुद्धां जय्यत तयार होती. पण डी व्हॅलेराच्या भाषणांत त्याला पकडण्यासारखा एकही शब्द सरकारला कांहीं केल्या सांपडेना. आयर्लंडला संपूर्ण स्वातंत्र्यासाठीच झगडावयाचे आहे असे तो आपल्या प्रत्येक भाषणांत निर्भीडपणे प्रतिपादन करीत असे हे खरे. पण अमेरिकेचे प्रेसिडेंट वुइल्सन यांनी स्वायतत्तेसंबंधी काढलेल्या चवदा तत्त्वांच्या जाहिरनाम्याशी, व लहान राष्ट्रांबद्दल सहानुभूति दर्शविण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी वेळोवेळी काढलेल्या जाहिरनाम्यांशीं त्याची ती भाषणे इतकी तंतोतंत जुळणारी असत, की त्यांवरून त्याला पकडणे सरकारला अशक्य होते. सरकार आपल्याला केव्हां तरी व कांहीं तरी खुसपट काढून पकडणार हे डी व्हॅलेरा पक्कें समजून होता. त्याविषयी बोलतांना एका जाहीर भाषणांत तो म्हणाला, * सरकारने मला पकडावे म्हणून पुष्कळ लोक हाकाटी करीत आहेत. पण मला तुरुंगात घातलें म्हणून काय होणार ? मी गेलो तर माझ्या मागे माझे काम करावयास दहा मंडळी पुढे येतील, व त्यांचीही जागा भरून काढावयास आणखी दहा लोक तयार होतील ! ) इंग्लंडचे मुत्सद्दी या वेळीं दुहेरी डाव खेळण्याचा प्रयत्न करीत होते. एकीकडे त्यांना जगाला असे भासवावयाचे होते, की केवळ इंग्रजी साम्राज्याविरुद्धच नव्हे, तर सा-या दोस्त राष्ट्रांच्या व अमेरिकेच्याही विरुद्ध आयरिश लोक उठले आहेत; व दुसरीकडे आयर्लंडमध्ये विशेष गडबड नाहीं, आम्ही लोकांच्या मागण्या पुण्या केल्या असल्यामुळे ते आतां संतुष्ट व शांत झाले आहेत तेव्हां आता तुम्ही महायुद्धांत पडा असा त्यांना अमेरिकेला आग्रह करावयाचा होता. हा डाव साधण्यासाठी सरकार नाना प्रकारच्या युक्त्या योजीत होते. जॉन डिलनसारखे लोक मायदेशाच्या कल्याणाकडे लक्ष द्यावयाचे सोडून