पान:डी व्हँलरा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ डी व्हॅलेरा पण डी व्हॅलेराने आपले कार्य धिमेपणाने चालू ठेविले होते. लॉईड जॉर्जने भरविलेल्या कन्व्हेन्शनचे कसे बारा वाजले त्याची हकीकत मागे दिलीच आहे. ती परिषद जनतेला नको होती व म्हणूनच ती अयशस्वी ठरली. पण आतां डी व्हॅलेराने आपल्या पक्षाची परिषद भरविण्याचे ठरविले, व शेवटी आक्टोबरच्या २५तारखेस सिनफेनची जंगी परिषद भरली. आयर्लंडच्या निरनिराळ्या परगण्यांतून एकंदर १७०० प्रतिनिधि या सभेस आले होते, व सिन फेन पक्षाचा अध्यक्ष निवडण्याचे महत्त्वाचे काम सभेकडून व्हावयाचे होते. अध्यक्षाच्या जागेसाठीं आर्थर ग्रिफिथ, काउंट प्लंकेट व इमॉन डी व्हॅलेरा हीं तीन नांवे सुचविण्यांत आली होती. सिन फेनच्या शत्रूना वाटत होते, की अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रश्नावरच रणे माजून परिषद मोडेल, व परिषदेच्या वेळी त्यांनी तसल्या बातम्या पसरविण्यासही कमी केले नाही. पण त्याचे हे सर्व प्रयत्न विफल ठरले. कारण अध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रश्न परिषदेपुढे आल्याबरोबर ग्रिफिथ आणि प्लंकेट यांनी आपलीं नांवें परत घेतली व डी व्हॅलेरासारख्या मुत्सद्यास व शूर शिपायास निवडून देण्याविषयी त्यांनी परिषदेतील सर्व सभासदांस विनंति केली. असे झाल्यामुळे डी व्हॅलेरा अध्यक्ष म्हणून निवडून आला व त्याबद्दल सर्वांनीं जयघोषाने आपला आनंद व्यक्त केला. | डी व्हॅलेरावर आयरिश लोकांची किती निःसीम भक्ति आहे हे आतां सा-या जगाच्या पुरते निदर्शनास आलें. डी व्हॅलेरा ही एक बडी शक्ति आहे असे इंग्लंडच्या मुत्सद्यांना वाटू लागले. डी व्हॅलेराला पकडीत कां नाहीं असे प्रश्न पार्लमेंट सभेत कांहीं सभासद विचारावयास लागले. डी व्हॅलेराने नवे प्रजासत्ताक सैन्य उभारले तरी सरकार स्तब्ध कसे बसलें आहे असा इंग्रज वृत्तपत्रांनीं ओरडा सुरू केला. डी व्हॅलेराला पकडण्याच्या इच्छेपुरतेच बोलावयाचे झाले तर ती इच्छा सर