पान:डी व्हँलरा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१८ सालची झटापट । २९ जो आनंद झाला त्याला तर सीमाच नव्हती. एवढे यश मिळेल, व प्रतिपक्ष्याला आपण इतका चीत करू अशी त्यांना कल्पनाही नव्हती. या निवडणुकीच्या प्रसंगानें क्लेअर परगण्यांत सिन फेन पक्ष कल्पनातीत प्रबळ झाला. डी व्हॅलेरा निवडणुकीत यशस्वी झाला हे पाहून सरकार मनांतल्या मनांत फारच जळफळू लागले. डी व्हॅलेराच्या पक्षाचा नायनाट करावाले सरकारला वाटू लागले, व या इच्छेला अनुसरून निवडणुकीच्या वेळीं डी व्हॅलेरास ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्यांची कांहीं तरी क्षुलुक सबबीवर धरपकड करण्याचा संपाटा सरकारने सुरू केला. या लोकांना शिक्षा ठोठावण्यांत आल्या व नीच प्रतीच्या बेरड गुन्हेगारांप्रमाणेच त्यांना वागविण्यांत येऊ लागले. या प्रकाराचा निषेध करण्याकरितां या सर्व लोकांनी तुरुंगांत प्रायोपवेशन केले. या प्रायोपवेशनांतच शेवटीं टॉमस अंश हा प्रसिद्ध पुढारी मरण पावला व त्यामुळे जिकडे तिकडे मोठी खळबळ उडाली. यासंबंधीं स्मिथफील्ड येथे प्रचंड जाहीर सभा होऊन तींत डी व्हॅलेराने भाषण केले व असा ठराव पुढे मांडला, की प्रेसिडेंट वुइल्सन यांच्या चवदा तत्त्वांपैकी * कोणत्याही लोकांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही राज्यकर्त्यांची सत्ता नसावी' या तत्त्वाला अनुसरून चळवळ केल्याबद्दल इंग्रज लोक आयरिश लोकांचा अनन्वित छळ करीत आहेत इकडे दोस्त राष्ट्रांनी व अमेरिकेनें लक्ष द्यावे. आतां डी व्हॅलेरावर सरकारने फारच करडी नजर ठेवण्यास प्रारंभ केला. गुप्त पोलीस त्याच्या पाठोपाठ सावलीसारखे हिंडू लागले. तो परगांवीं निघाला, की ज्या गांवीं तो जावयाचा असेल तेथील पोलिसांना १६ आज संध्याकाळी ४।।।च्या गाडीनें “पार्सल' येथून निघाले आहे. सावध असा असले सांकेतिक भाषेचे विद्युत्संदेश जाऊ लागले.