पान:डी व्हँलरा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ डी व्हॅले। आपापला उमेदवार उभा केला. डी व्हॅलेरा या वेळीं लुई येथील तुरुगांत होता. प्रजासत्ताक पक्षाने मुद्दाम डी व्हॅलेरा याचे नांव पुढे केले. उमेदवार म्हणून त्याला उभे केल्यावर त्याला बंधमुक्त करण्याखेरीज सरकारला गत्यंतर उरलें नाहीं. पण ही प्राप्त गोष्ट करतांना साधल्यास औदार्याचे नाटक करावे व लोकांना चकवावे या हेतूने सरकारने डी व्हॅलेराबरोबरच बाकीच्याही सर्व कैद्यांना सोडून दिलें, व कन्व्हेन्शन यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी सरकार व प्रजाजन यांमध्ये स्नेहभाव उत्पन्न व्हावा व कन्व्हेन्शन फलदायी व्हावी म्हणून ही उदारपणाची कृति आम्ही करीत आहोत असे सरकारकडून सांगण्यांत आले. १८ जून रोजी तुरुंगांतून सुटून डी व्हॅलेरा डब्लिन शहरीं आला तेव्हां लोकांनी त्याचे जंगी स्वागत केले. ईस्ट क्लेअरचे लोक त्याला भेटण्यासाठी मुद्दाम आले होते; व त्यांनी त्याला डब्लिनमध्ये थोडाच वेळ थांबू देऊन लगेच क्लेअरकडे नेले, तेथे निवडणुकीची तयारी जोराने चालली होती, व प्रत्येक पक्ष विजयसंपादनासाठी शिकस्तीचे प्रयत्न करणार हे उघड दिसत होते. डी व्हॅलेराच्या प्रतिस्पर्ध्याला जॉन रेडमंड सारख्या बड्या धेडाचा पाठिंबा असल्याकारणाने त्याच्याशी झगडून निवडून येणे सोपी गोष्ट नव्हती. पण डी व्हॅलेराच्या पुरस्कर्त्यांनी अटोकाट प्रयत्न करण्यासाठी कंबरा बांधल्या होत्या. त्या वेळीं साच्या लेअर परगण्यांतील लोकांच्या तोंडी डी व्हॅलेराच्या यशापशयाचा विषय अहोरात्र भिजत होता. काही झाले तरी आपण डी व्हॅलेरास थोडे तरी मताधिक्य मिळवून देऊ अशी सिन फेन पक्षाच्या लोकांना आशा वाटत होती, व प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ आला तसतशी त्यांची ही आशा वाढतच गेली. आणि शेवटी निवडणूक होऊन मते मोजण्यांत आलीं, व २९७५ मते अधिक मिळून डी व्हॅलेरा निवडून आल्याचे जाहीर करण्यांत आले, त्या वेळी त्याच्या पक्षाच्या लोकांना