पान:डी व्हँलरा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१८ सालची झटापट २७ जॉन रेडमंड यांना या कन्व्हेन्शनपासून फार फायदा होईल असे वाटलें व देशांतील सर्व पक्षांतील लोक या सभेचे स्वागतच करतील असा आपला विश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखविलें. अल्स्टर येथील युनिअनिस्ट पक्षाच्या मंडळाची सभा भरली तिच्यामध्येही ३५० सभासदांपैकी अवघ्या चारच सभासदांचे मत विरुद्ध पडून या सभेस प्रतिनिधि पाठविण्याचा ठराव पास झाला. सिन फेन पक्षाच्या लोकांनी मात्र ही कन्व्हेन्शन म्हणजे बेसावध पुढा-यांना पकडण्यासाठी सरकारने मांडलेला सांपळा आहे असे लोकांना बजावून सांगितलें, व तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा निश्चय केला. कन्व्हेन्शनमध्ये युनिअनस्ट पक्षाचे मवाळाग्रणी हजर असल्यावर एकमतानें कांहींही ठरणे शक्य नाहीं असे सिन फेन पक्षाला वाटत होते. खेरीज असे, की सभेत एकमत झाले किंवा नाहीं ते ठरविणार कोण? तर लॉइड जॉर्ज ! अशा परिस्थितींत ही सभी म्हणजे केवळ फार्स होता. * आयर्लंडच्या लोकांना बोलत ठेवण्याची ही एक युक्ति आहे. आणि आयर्लंडचे लोक बोलण्यांत गुंतून दंगा करीनातसे झाले, की आम्हीं आयर्लंडच्या मागण्या पुन्या केल्या आहेत, आता तुम्ही महायुद्धांत आमची बाजू उचला असे अमेरिकेस सांगण्याचा ब्रिटिश मुत्सद्यांचा हा डाव आहे ' असे सर एफ. ई. स्मिथ यांनी जे एका प्रसंगी बोलून दाखविलें तें यथार्थ होते. अशा प्रकारे सिन फेन पक्ष केन्व्हेन्शनमध्ये बिलकुल सामील न झाल्यामुळे त्या कन्व्हेन्शनला कांहींच महत्त्व उरलें नाहीं, व लॉइड जॉर्ज यांच्या सर्व आशा मावळून त्यांनी रचलेला व्यूह फसला. | राजकीय वातावरण अशा स्वरूपाचे असतांना वुइल्यम रेडमंड नांवाचे पार्लमेंटचे एक सभासद फ्रान्समध्ये गेले होते ते तेथेच मरण पावले. ते ईस्ट क्लेअर परगण्यातर्फे निवडलेले होते. त्यांची रिकामी जागा भरून काढण्यासाठी निवडणूक व्हावयाची ठरली, व प्रत्येक पक्षाने ई