पान:डी व्हँलरा.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंडखोराला जन्मठेप चांगलीच झटापट झाली, व शेवटीं उघड उघड फाटाफूट होऊन पथकांची चळवळ पूर्वीच्या धोरणाने चाळं झाली. ही फाटाफूट झाल्यावर 'आयरिश लोकांचे जे जन्मसिद्ध हक्क आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी ही स्वयंसेवकांची चळवळ आहे' असा जाहिरनामा १९१४ मध्ये सप्टेंबरच्या २४ तारखेस निघाला. त्या वेळीं डी व्हॅलेरा डब्लिनच्या पथकांतील एका तुकडीचा अधिकारी होता. १९१४ च्या जुलई महिन्यांत हौथ येथे शस्त्रसामुग्री आणून सांठविण्याचा जो धाडसाचा उपक्रम स्वयंसेवकांनी केला त्यांत डी व्हॅलेराने अधिकारी या नात्याने प्रमुखपणे भाग घेतला; आणि डब्लिनला जात असतां वाटेत स्वयंसेवकांची व सरकारी शिपायांची गांठ पडून जी चकमक उडाली त्यांत डी व्हॅलेरा जखमीच व्हावयाचा पण थोडक्यांत निभावलें ! या प्रसंगापासून पुढे डी व्हॅलेराने स्वयंसेवकांच्या कार्यात आपले सर्व लक्ष घातले. शस्त्रास्त्रांबद्दल त्याला कसे प्रेम वाटत असे हे मागे एके ठिकाणी आम्ही सांगितलेच आहे. लष्करी पेशाच्या त्याच्या स्वाभाविक आवडीमुळे या स्वयंसेवकांच्या चळवळींत तो मनापासून पडला. त्याची बुद्धिमत्ता व कार्यदक्षता अल्प काळांतच लोकांच्या प्रत्ययास आली, व १९१५ मध्ये लिमेरिक येथे सर्व स्वयंसेवकांचे संमेलन होऊन पाहणी झाली त्या वेळी पी. एच. पिअर्स यांच्या खालोखालच्या अधिकारावर डी व्हॅलेरा होता. तथापि अजूनही तो विशेष प्रसिद्ध नव्हता व वर्तमानपत्रांतून त्याचे नांव झळकू लागले नव्हते. कारण प्रसिद्धीची त्याला हौस नव्हती; इतकेच नव्हे, तर प्रसिद्धीची त्याला लाजेच वाटत असे. या सुमारास एक गंमतीदारे प्रसंग घडला त्यावरून डी व्हॅलेराच्या अंगांत कोणते पाणी खेळते होते याची मात्र पूर्ण कल्पना येण्यासारखी आहे. तो प्रसंग असा. सेंट पॅट्रिकच्या सणानिमित्त स्वयंसेवकांची परेड व्हावयाचे ठरले होते. ती परेड कशी काय होते तें गुप्तपणे पाहून रिपोर्ट करण्यासाठी