पान:डी व्हँलरा.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ डी व्हॅलेरी लॉर्ड पॉवर्सकोर्ट यांस सरकारने पाठविलें. ठरल्याप्रमाणें परेड सुरू झाल्यावर हे लॉर्ड त्या ठिकाणी आले, व ज्या जागीं डी व्हॅलेरा आपल्या तुकडीची कवाईत घेत होता त्या जागेवर जाऊन कवाईत करणाच्या स्वयंसेवकांची रांग ओलांडून पुढे होऊ लागले. हैं पाहतांच डी व्हॅलेराने लॉर्डसाहेबांस ताबडतोब हटकलें व पुढे पाऊल टाकण्याची मनाई केली. ती मनाई पाहून लॉर्डसाहेब गरम झाले वे त्यांनी रागारागाने मनाईचे कारण विचारले. डी व्हॅलेराने त्यांच्या रागाला न जुमानतां स्पष्ट सांगितले, की सरकारचे सैन्य रस्त्याने जात असतां जशी रस्ता ओलांडण्याची सा-या लोकांना मनाई असते तशीचे ही मनाई आहे, सैन्याच्या शिस्तीपुढे लॉर्ड व भिकारी सारे सारखेच ! स्वयंसेवकांवरील अधिकारी होण्यास डी व्हलेरा सर्वस्वी लायक होता. त्या कार्याला लागणारे गुण त्याच्या अंगी प्रामुख्याने होते. आयरिश भाषेत अस्खलित बोलणारा वक्ता म्हणून त्याची प्रसिद्ध होती, तो शूर व धाडसी होता, आणि नेकी आणि शिस्त त्याच्या बोलण्याचालण्यांत हरघडी दिसत असे. दिसावयास तो भव्य दिसतं असे. शरीराच्या बांध्याच्या बाबतीत त्याने आपल्या आईच्या घराकडील वळण घेतले आहे. सहा फुटांपेक्षाही त्याची उंची अधिक आहे. अंगानें तो लङ नसला तरी भरभक्कम दिसतो. त्याचा भालप्रदेश विशाल आहे, आणि त्याच्या पाणीदार, पिंगट डोळ्यांतील चमक पाहिली, की त्याच्या कराराची व सामर्थ्याची ताबडतोब ओळख पटते. । स्वयंसेवकांचा अधिकारी या नात्याने डी व्हॅलेराचा मॅक्नील, पिअर्स वगैरे पुढच्यांशीं पुष्कळच निकट संबंध आला, व गुप्तपणे होणा-या खास खलबतांतही ते पुढारी त्याला घेऊ लागले. ईस्टरच्या बंडाची तयारी करण्यासाठी रॉजर केसमेंट हा आयरिश देशभक्त जर्मनींत गेला होता व त्या देशाची सहानुभूति संपादन करून व दारूगोळा, शस्त्रसामुग्री व लढाऊ शिपाई यांनी भरलेलें एक जहाज