पान:डी व्हँलरा.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। डी व्हॅलेरा : काय, समरप्रसंग उद्भवलाच तर नव्या चळवळीत सामील होऊन काम करण्याचेही कांहीं थोड्या सेनानींनी कबूल केले होते. याच सुमारास सरकारच्या कृतीला जॉन रेडमंड यांनी आपली संमति दिली, व आयर्लंडच्या फाळणीलाच रेडमंड यांनीं रुकार दिला असे लोक म्हणू लागले. अशा परिस्थितींत १९१३ च्या नोव्हेंबर महिन्यांत डब्लिन येथे स्वयंसेवक पथकाची स्थापना झाली, आणि स्वयंसेवकांची भरती व्हावयास प्रारंभ झाला. 'गेलिक लीग' संस्थेचे बहुतेक सभासद पथकांत दाखल झाले, तसाच डी व्हॅलेराही स्वयंसेवक बनला. सा-या आयलंडभर स्वयंसेवकांची पथके उभारण्यांत येऊ लागली. स्वयंसेवकांच्या कवाइतीही नियमाने व्हावयास लागल्या. सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष करण्याचे सोंग आणले होते तरी मनांतून सरकार त्या चळवळीवर बोटे मोडीत होते हे सर्वांनी ओळखले होते. रेडमंडच्या पक्षालाही ही चळवळ नको होती. पण ती कशी मारावी हें त्यांना समजेना. शेवटीं स्वयंसेवकांची पथके चिरडून टाकणे शक्य नाहीं तेव्हां त्या पथकांच्या कार्यकारी मंडळांत आपले लोक घुसडून तीं निःसत्त्व करून टाकण्याचा रेडमंड यांनी बेत केला. मी निवडलेले पंचवीस सभासद तुम्ही आपल्या मंडळांत घेतले पाहिजेत असे रेडमंड यांनी कार्यकारी मंडळाला पत्र लिहिलें, रेडमंडशी या वेळींच भांडण केलें तर पथकांची चळवळच एकदम नामशेष होईल असा विचार करून कार्यकारी मंडळाने रेडमंडचे म्हणणे कबूल केले. मूळ कार्यकारी मंडळ व रेडमंडचे नवे पंचवीस सभासद यांचा झगडा तेव्हांपासून सुरू झाला. प्रथम फारसा मतभेद झाला नाही, परंतु ज्यायोगें पथकांची चळवळच निष्प्राण होऊन जाईल असल्या नव्या धोरणाचा मंडळाने स्वीकार करावा अशाविषयी जेव्हां रेडमंडच्या सभासदांनी खटपट सुरू केली तेव्हा मात्र त्यांची व जुन्या सभासदांची