पान:डी व्हँलरा.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंडखोराला जन्मठेप १९ कोणते वळण मिळाले असते, व डी व्हॅलेराचे स्वतःचे चरित्र कोणत्या प्रकारचे झाले असते याविषयीं तर्कवितर्क करण्याचा मोह आपल्या मनाला होणे साहजिक आहे. पण असले तर्क करण्यांत काय अर्थ ? डी व्हॅलेराने त्या वेळी आईबरोबर अमेरिकेस जाऊं नये व त्याने पुढे लवकरच आयलंडच्या राजकारणाचा धुरंधर व्हावें या सा-या गोष्टी परमेश्वरी सूत्रांनी ठरलेल्याच होत्या. त्या घडून आल्यावांचून कशी राहतील ? सन १९१३ सालापर्यंत डी व्हॅलेरा शिक्षणाच्या शांत वातावरणांत होता. त्याच्या विद्वत्तेविषयीं परमादर बाळगणारे विद्यार्थि, त्याचे सहकारी प्रोफेसर व त्याचे आप्तेष्ट यांखेरीज डी व्हॅलेरा तोंपर्यंत फारसा कोणाला माहीत देखील नसेल. १९२३ सालीं आयलंडमध्ये तेव्हां स्वयंसेवकांची पथके उभारण्याची चळवळ* सुरू झाली त्याच वेळी डी व्हॅलेराने सार्वजनिक चळवळींत प्रथम भाग घेतला, व तेव्हांपासूनच त्याच्या सार्वजनिक चरित्राला खरा प्रारंभ झाला असे म्हणावयास हरकत नाहीं. १९१३ सालच्या सुमारास आयरिश होमरूलचे बिल कॉमन्सच्या सभेत पास करून घेण्यासाठी मुख्य प्रधान अॅस्क्विथ यांची जोराने खटपट चालली होती. हे बिल धुडकावून लावण्याच्या जाहीर उद्देशाने आयर्लंडचे पुढारी सर एडवर्ड कार्सन यांनी अल्स्टर परगण्याचे स्वयंसेवक पथक उभारण्याचा निश्चय केला होता. होमरूल बिल पास झाले तर आयरिश लोक आपापसांत युद्ध करतील असे लोक म्हणत होते. होमरूल बिलाविरुद्ध आम्हीं बंड करू अशी धमकी सर एडवर्ड आपल्या व्याख्यानांतून उघडपणे देत होते. सैन्यांतील कित्येक अधिका-यांनीं, कांहींनीं गुप्तपणे तर काहींनीं उघड उघड, या नव्या चळवळीला आपला पाठिंबा दर्शविला होता. इतकेच

  • या चळवळीविषयींची सविस्तर माहिती * हिंमतबहाद्दर टेरेन्स मॅस्विनी या आमच्या पुस्तकांत ७, ८, ९' या प्रकरणांत आम्ही दिली आहे.