पान:डी व्हँलरा.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ डी व्हॅलेरा साधा, आणि मनमिळाऊ होता. अशा तरुणीचे व डी व्हॅलेरासारख्या विद्वान्, सुंदर व दिलदार तरुणाचे प्रेम जमलें यांत आश्चर्य नाहीं. त्यांचा विवाह १९१० साली झाला. आतांपर्यंत डी व्हॅलेरास चार मुलगे आणि दोन मुली झालेल्या आहेत. डी व्हॅलेरा ब्लॅकरॉक कॉलेजांत प्रोफेसर असतांना १९०७ सालीं त्याची आई त्याला भेटण्यासाठी अमेरिकेहून मुद्दाम आली. डी व्हॅलेराला परत अमेरिकेस न्यावे असा तिचा विचार होता. राज्यकर्ते व प्रजाजन यांच्यामध्ये सुरू असलेल्या झगड्यामुळे आयर्लंड देशांत राहणे विशेष सुखाचे नव्हे असे तिला वाटत होते. डी व्हॅलेरा अमेरिकेत आल्यास तेथे त्याच्या असाधारण बुद्धिमत्तेचे खरे चीज होईल अशी तिची कल्पना होती. पण डी व्हॅलेराला आईचा हा बेत विशेष पसंत पडला नाहीं. शिक्षणाच्या साम्राज्यांत त्याने आता चांगलीच जागा पटकावलेली होती, विद्यार्थी वर्ग व कॉलेजचे अधिकारी या सर्वांना तो हवासा झाला होता, आणि अध्यापकाचे काम सोडून दुसरीकडे जाण्याची त्याच्या मनाची इच्छा नव्हती. शिवाय, अध्ययन व अध्यापन हाच आपल्या स्वभावाला योग्य असा व्यवसाय आहे अशी त्याची खात्री झाली होती, व त्या व्यवसायांत पूर्ण यश संपादन करण्याचा त्याचा निश्चय होता. * परमेश्वराने मला कांहीं फारशी उच्च दर्जाची बुद्धि| मत्ता दिली आहे असे नाही. पण तिच्या सहाय्यानेच उच्च दर्जाची जागा मिळविल्याखेरीज मला चैन पडणार नाही' असे डॅनिअल ओकोनेल याने पूर्वी एका प्रसंगी उद्गार काढले होते. या उद्गारांत प्रतिबिंबित झालेल्या विचारांप्रमाणेच डी व्हॅलेराच्याही मनांतील विचार होते. त्याने आपले हे विचार आईपुढे मांडले तेव्हा तिने त्याला अमेरिकेस चलण्याविषयी अधिक आग्रह केला नाहीं, व डी व्हॅलेराने आयलंडांतच रहावे असे उभयतांच्या मताने ठरले. या वेळी डी व्हॅलेरा अमेरिकेस गेला असता तर आयर्लंडच्या राजकारणाला