पान:डी व्हँलरा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंडखोराला जन्मठेप १७ | भाषेचा अत्मिा वावरत आहे असा दुस-या माणसाला भास होत असे. या कॉलेजांतच डी व्हॅलेरा व रॉजर केसमेंट हितगुज करीत बसंत व आयरिश भाषेचा पुनरुद्धार करण्याची चळवळ कोणत्या उपायांनी जोराने पुढे ढकलावी याविषयी अनेक प्रकारचे बेत करीत. त्या दोघांचे एकमेकावर अकृत्रिम प्रेम होते, व त्यांच्या सहकार्याने आयरिश भाषेच्या चळवळीला खरोखर फार मोठे सहाय्य झाले असते. पण परकी अंमलाखाली कुजणाच्या राष्ट्रांत अनेक गोष्टी झाले असते या सदराखालीच जाऊन पडतात ! तसेच याही बाबतीत झालें. रॉजर केसमेंटसारख्या देशभक्ताला इंग्रज सरकारच्या फांसावर १९१४ सालीं मरण आले, आणि त्याचा च डी व्हॅलेराचा स्नेहसंबंध अकरमा कामयचा संपला ! डी व्हॅलेराच्या आयुष्यातील आणखी एंको महत्त्वाच्या गोष्टीलाही त्याचा आयरिश भाषेचा व्यासंगच कारण झाला. ती गोष्ट म्हणजे त्याचा विवाह होय. आयरिश भाषेला चलन देण्यासाठीं ‘गेलिक लीग या संस्थेने शहरोशहरी आपले वर्ग काढले होते. अशा एका वर्गातच डी व्हॅलेरा च कुमारी सिनिङ नी फ्लॅनागेन यांची गांठ पडली. डी व्हॅलेरा हा ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, व जर्मन या भाषांत प्रवीण होता, आणि कुमारी सिनिड ही आयरिश भाषेत तयार होती. तेव्हां दोघांनी एकमेकांच्या भाषाकोविदत्वाचा फायदा करून घ्यावयाचे ठरविले, आणि डी व्हॅलेराने कुमारी सिनिड इला जर्मन शिकवावयाचे व तिने डी व्हॅलेरास आयरिश शिकवावयाचे असा क्रम सुरू झाला. अशा प्रकारे त्या दोघांची प्रथम ओळख झाली, परिचयाने त्यांचा स्नेह जमला, १ कालांतराने स्नेहाचे प्रीतींत रूपांतर झालें. सिनिडचे आयरिश भाषेवर चांगले प्रभुत्व होते; एवढेच नव्हे तर, त्या भाषेबद्दल तिला अंतःकरणपूर्वक अभिमान व प्रेम बाटे आणि सा-या आयर्लंडभर आयरिश भाषेचा प्रसार ब्हावा अशी तिची प्रबळ इच्छा होती. तिचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, डी...२