पान:डी व्हँलरा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ डी व्हॅलेरा नव्हे तरी अंशतः खरेच होणार होते हे त्याचे त्याला देखील माहीत नव्हतें ! मग इतरांना त्याची काय कल्पना असणार ? लहानपणापासूनच आयरिश भाषेवर त्याची निस्सीम भक्ति होती. लहानपणीं तो आपल्या आजीजवळून नवे नवे आयरिश शब्द शिकून घेत असे. पुढे मोठेपणांहीं आयरिश भाषा चांगल्या त-हेने बोलणारे कोणी भेटले, की त्याला आनंद होत असे व त्याच्याशीं तो पुष्कळ वेळ संभाषण करी. ब्ररीमध्ये एक वृद्ध चांभार होता त्याला आयरिश भाषा चांगली येत असे. या चांभाराशीं डी व्हॅलेराने गट्टी केली व एखादा प्रश्न विचारतांच सुरू होणारे त्याचे लांबलचक चव्हाट तो मोठ्या आनंदाने व लक्षपूर्वक ऐकत असे. गोष्टी सांगण्यांत तो चांभार, मोठा पटाईत असे. व त्याच्या सांगण्याच्या पद्धतीत एक प्रकारची मौज आणि ताजेपणा असे. या चांभाराच्या बडबडीपासून डी व्हॅलेराने विविध माहिती मिळविली, व विशेष महत्त्वाची गोष्ट ही, की आयरिश उच्चारांचे जें एक सूक्ष्म वैशिष्टय ते त्याने संपादन केले. आयरिश भाषेचा अभ्यास करता करतांच रॉजर केसमेंट या विख्यात् देशभक्ताशीं डी व्हॅलेराचा स्नेह जमला. ट्वेन येथील ‘आयरिश' कॉलेजमध्ये त्या दोघांची प्रथम गांठ पडली व तेव्हांपासून त्यांचा स्नेह उत्तरोत्तर वृद्धिंगतच होत गेला. आयरिश कॉलेजांत अध्यापनाचे कामही डी व्हॅलेराने कांहीं दिवस केले. आयरिश भाषेविषयीं परमादराची भक्ति असलेली मंडळी या कॉलेजांत जमत. या मंडळींच्या हृदयांतील स्वभाषा व स्वदेश यांविषयींचा अभिमान किती जाज्वल्य होता याची खरी कल्पना त्या कॉलेजांती विद्याथ्याखेरीज इतरांस होणे शक्य नाही. त्या कॉलेजांत आयरिश भाषेखेरीज दुसरी भाषा क्वचितच ऐकावयास येई. शिक्षण आयरिश भाषेत, गुरुशिष्यांचा सारा व्यवहार आयरिश भाषेत, शिक्षकांचे वादविवाद आयरिश भाषेत, थट्टा विनोदही आयरिश भाषेत. सारांश, त्या कॉलेजच्या इमारतींत आयार।