पान:डी व्हँलरा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंडखोराला जन्मठेप अनेक प्रश्नांचा तत्त्वज्ञानाशी संबंध येतो असे वाटल्यावरून त्याने त्याही विषयाचा अभ्यास केला. त्याप्रमाणेच शिक्षणाचे शास्त्र व पद्धति या विषयांवर प्रोफेसर कॉर्कोरीन यांची व्याख्याने त्याने ऐकलीं. लॅटिन, ग्रीक व फ्रेंच या भाषांचा तर त्याने अभ्यास केलाच, परंतु आयरिश, भाषेत प्राविण्य मिळविण्यासाठी त्याने विशेष मेहनत केली. तसेच सूर्यकिरणें, विद्युत् वगैरे पदार्थशास्त्रांतील कांहीं शाखांचा त्याने संशोधक वृत्तीने अभ्यास करून कांहीं नवे शोधही केले. या सर्व गोष्टींवरून केवळ पदवीसाठी ग्रंथ वाचण्याची दृष्टि न ठेवतां न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' या उदात्त भावनेला अनुसरून डी व्हॅलेराने अनेक विषयांचा अभ्यास कसा केला ही गोष्ट वाचकांच्या ध्यानांत सहज येईल. | ब्लॅकॉक कॉलेजांत डी व्हॅलेरा प्रोफेसरचे काम करीत असतांना त्याच्या शिकविण्याच्या कुशल पद्धतीबद्दल त्याची सर्वांनी वाहवा केली. कॉलेजला सुटी झाली, कीं तो ब्रूरीला आपल्या मामाच्या घरी येत असे. फुटबॉलसारखे मर्दानी खेळ तो अजूनही खेळत असे; पण त्या खेळापेक्षा त्याला आतां शिकारीचा फार नाद लागला. तो निशाणबाजींत पटाईत होता व शिकारींत व्यायाम, आनंद, आणि खाद्य या सर्वांचा लाभ होत असल्यामुळे शिकार खेळण्यापुढे इतर सारे खेळ त्याला फिके वाटू लागले. बंदुकीच्या प्रत्येक भागाचा त्याने लक्षपूर्वक अभ्यास केला, आणि चांगले हत्यार दिसले की ते विकत घेतल्याशिवाय तो राहिला नाहीं. दर सुटीत एक नवी बंदूक खरेदी करून तो घरी येई. उमदा घोडा पाहिला, कीं अरब माणूस जसा मोहित होतो तसाच डी व्हॅलेरा चांगले हत्यार पाहिलें कीं मोहून जात असे. एकदां तर आपल्या एका मित्राजवळ तो म्हणाला, “ बंदुकीइतकी दुसरी कोणती गोष्ट मला प्यारी नाहीं. मी शिपाई होणार आहे की काय कोणास ठाऊक! हे शब्द डी व्हॅलेराने विनोदाने उचारले खरे; पण ते शब्द पुढे पूर्णाशाने