पान:डी व्हँलरा.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. प्रक प्रकरण २ रें बंडखोराला जन्मठेप रॉथलुक येथील शाळेतील अभ्यासक्रम दोन वर्षांत पुरा करून १८९८ च्या ऑगस्टमध्ये डी व्हॅलेरा डब्लिनच्या ब्लॅकॉक कॉलेजमध्ये गेला. तेथेही त्याने आपलें बुद्धिवर्चस्व प्रगट केले व दर वर्षी शिष्यवृत्त्या मिळविल्या. उपशिक्षक या नात्याने रोज कांहीं तास कॉलेजांत शिकविण्याचे काम करूनही त्याने उत्कृष्ट रीतीने अभ्यास केला हे विशेष कौतुकास्पद होय, असे त्या कॉलेजचे अध्यक्ष रेव्हरंड ब्रेनन हे नेहमी म्हणत. कॉलेजच्या अधिका-यांची त्याजवर इतकी मर्जी होती, की गणित व पदार्थविज्ञानशास्त्र या विषयांच्या प्रोफेसरची जागा रिकामी होतांच तिच्यावर त्यांनी त्याची नेमणूक केली. त्याचा गणित विषय विशेष तयार होता व तो विद्यार्थ्यास शिकविण्याची त्याची हातोटीही स्पृहणीय होती. | डी व्हलेरा रॉयल युनिव्हर्सिटीतून १९०४ मध्ये बी.ए. झाला. बी.ए. झाल्यानंतर शुद्ध गणित व पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक गणित हे दोन विषय घेऊन एम. ए.ला बसण्याची त्याने तयारी चालविली. परंतु याच वेळी कॅरीस्फोट येथील ट्रेनिंग कॉलेजांत तो गणिताचा प्रोफेसर होता; त्यामुळे एकीकडे शिकविणे व दुसरीकडे एम. ए.च्या परीक्षेची तयारी करणे त्याला उत्तरोत्तर दुरापास्त वाटू लागले, व शेवटीं एम. ए.चा विचार त्याला रहित करावा लागला. शेवटी हा एम. ए.चा बेत अनेक कारणांनी कायमचा रहित होऊन डी व्हॅलेरा फक्त बी. ए. बीएस्. सी. झाला. बाकी एम. ए.ची पदवी त्याच्या नावापुढे जरी नसली तरी मोठ्या विद्वानांनाही गप्प बसविण्याइतके त्याचे ज्ञान होते. कारण एम. ए.चा अभ्यास करीत असतांना त्याने अनेक विषयांचा व्यासंग केला. उच्च गणिताचा अभ्यास करतां करतां त्यांतील