पान:डी व्हँलरा.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकली मुलगा १३ बसे. एखाद्या मुद्यावर त्याच्या मामाने त्याला कांहीं प्रश्न केला तरी दोन तीनदां खोंचून विचारावे तेव्हां तो उत्तर देई, आणि तेही मोठेसे मनापासून दिलेले नसे. असो. डी व्हॅलेराच्या घरापासून ‘खिस्ती बंधू'ची शाळा सहा मैल लांब होती, सकाळी शाळेत जातांना डी व्हॅलेरा रेलवेने जात असे, व संध्याकाळीं परत यावयाच्या वेळीं कधी एखाद्या सोबत्याच्या गाडींत किंवा कधीं पायींच तो घरी येत असे. शाळेतून परत येतांना रेलवेने यावयाचे म्हणजे गाडीची वेळ होईपर्यंत थांबणे भाग होते, कारण शाळा सुटल्यानंतर पुढे तीन तास रॉथलुर्कहून सुटणारी गाडीच नव्हती. अभ्यासांत किंवा मर्दानी खेळांत सारा वेळ घालवू इच्छिणा-या डी व्हॅलेराला स्टेशनवर तीन तास थांबण्याची कल्पना पटणे शक्यच नव्हते. म्हणून पायी घरी परत येणेच त्याला बरे वाटे, आणि पुष्कळ वेळा तर असे होत असे, कीं डी व्हॅलेराने घरी परत येऊन आपला संध्याकाळचा व्यायाम देखील संपवावा आणि मग लिमेरिकला जाणारी गाडी त्याच्या घरापुढून भकभक करीत जावी ! | ‘खिस्ती बंधू'च्या शाळेत असतांना डी व्हॅलेराने फारच झटून अभ्यास केला व त्याचे फलही त्याला लवकरच मिळाले. त्याला ९०० रुपयांची एक शिष्यवृत्ति मिळाली. * सर्वात निंद्य उधळेपणा कोणता असेल तर मनुष्याने आपला वेळ व्यर्थ घालविणे हा होय' हे फ्रेंच लेखक व्होल्टेर याचे उद्गार डी व्हॅलेराने आपल्या दृष्टीपुढे जणू काय सतत ठेवले होते. त्याने आपला शाळेतील अभ्यासक्रम उत्कृष्ट रीतीने पार पाडला, आणि शिक्षकांचे प्रेम संपादन करून आणि विद्वत्तेबद्दल कीर्ति मिळवून आपल्या मामाच्या उत्तेजनाचे चीज केलें. डी व्हॅलेराच्या या गुणांमुळे पॅट्रिक कोल यांना मोठी धन्यता वाटली व त्याला पुढे कॉलेजांतील शिक्षण देण्याचा त्यांनी ताबडतोब निश्चय केला.