पान:डी व्हँलरा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डी व्हॅलेरा भंडावून सोडीत असे. अनेक प्रकारच्या सोप्या व कठीण विषयांसंबंधीं तो माहिती विचारी. यामुळे आपल्या भाच्याला उच्च शिक्षण दिलें पाहिजे असे पॅट्रिक कोल यांनी आपल्या मनाशीं अर्धवट ठरवून ठेविलेंच होते. त्यांतच गरेट हेज या शिक्षकांच्या शिफारशीची भर पडली, मग काय, ताबडतोब सारी व्यवस्था करण्यांत आली, आणि सन १८९६ मध्ये नोव्हेंबरच्या २ तारखेस रॉथलुर्क येथील “ ख्रिस्ती बंधू'च्या शाळेत डी व्हॅलेरा दाखल झाला. | डी व्हॅलेराला 'ख्रिस्ती बंधू'च्या शाळेत घातल्याबद्दल त्याचे मामा प्रशंसनेला पात्र आहेत. पॅट्रिक कोल यांची सांपत्तिक स्थिति यथातथाच होती हे लक्षात घेतले असतां ते अधिकच प्रशंसनीय ठरतात. एकंदर विचार केला तर खरोखरच असे म्हणावे लागते, कीं डी व्हॅलेराच्या संगोपनाचे व शिक्षणाचे काम पॅट्रिक कोल यांच्यासारख्या दूरदर्शी, बुद्धिमान् आणि प्रेमळ मनुष्याच्या हाती पडले ही एक ईश्वरी योजनाच म्हटली पाहिजे. पॅट्रिक कोल हे तैल बुद्धीचे आणि दिलदार अंतःकरणाचे गृहस्थ होते. त्यांच्या शरीराचा बांधाही धिप्पाड आणि भव्य होता. त्यांची उंची सहा फूट चार इंच होती, व त्यांचा चेहरा मोठा रुबाबदार दिसे, लिमेरिक परगण्यांत ते प्रसिद्ध होते. मजुरांच्या चळवळींत ते बरेच लक्ष घालीत, व त्यांची व्याख्याने परिणामकारक असत. १९१६ सालच्या बंडापर्यंत ते वुइल्यम ओब्रायनच्या राजकीय मतांचा पुरस्कार करणारे होते. पॅट्रिक कोल असे सांगत-व ही एक जरा नवल वाटण्यासारखीच गोष्ट आहे-की लहानपणीं डी व्हॅलेराला राजकारणाचा विषय बिलकुल आवडत नसे. पेंटिक कोल यांच्याकडे त्यांचे मित्र बोलाबसायला वारंवार येत, व मग संभाषण ऐन भरांत आले, की त्या वेळच्या राजकीय पुढा-यांच्या गुणावगुणांची चर्चाही साहाजिकपणेच सुरू होत असे. अशा वेळी त्या वादविवादाकडे बिलकुल लक्ष न देतां डी व्हॅलेरा एखादे पुस्तक वाचीत