पान:डी व्हँलरा.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकला मुलगा ११ ज्या वेळी त्याला अभ्यास करावयाचा नसे त्या वेळीं फुटबॉलच्या मैदानावर खेळतांना, किंवा धांवण्याच्या रंगणावर पळतांना तो दिसावयाचा. अभ्यासही नाहीं आणि खेळही नाहीं असला निर्जीव क्रम त्याला मनापासून तिरस्करणीय वाटे. केवळ आळसांत आयुष्याचा एकही क्षण दवडण्याची त्याची इच्छा नसे ! बैठ्या खेळांची मात्र त्याला मुळीच आवड नव्हती. मर्दानी खेळांकडे त्याच्या मनाची धांव असे. पुष्कळ वेळा असे होत असे, की त्याच्या मामाने त्याला कांहीं निरोप सांगण्यासाठी किंवा चिठीचपाटी नेऊन देण्यासाठी पाठवावे, आणि वाटेत एखादा खेळ चालला असला, कीं डी व्हॅलेराने त्यांत सामील व्हावे व मग त्याला निरोपाचे भानही राहूं नये किंवा हातांतील चिठीचा कागद मुद्दाम बाजूला ठेवला असला तर तो वान्याने उडून देखील जावा ! | डी व्हॅलेरा तेरा वर्षांचा होता त्यावेळी जॉन केली हे शिक्षक जाऊन त्यांच्या जागी गरेट हेज नांवाचे शिक्षक आले. डी व्हॅलेराच्या बुद्धीविषयी त्यांचे इतके चांगले मत झाले, की त्यांनी त्याच्या मामांची मुद्दाम गांठ घेतली, व त्याला एखाद्या मोठ्या शाळेत पुढील अभ्यासाकरितां पाठविण्याची त्यांस जोराची शिफारस केली. डी व्हॅलेराचे मामा पॅट्रिक कोल यांनी आपल्या भाच्याची बुद्धिमत्ता केव्हांच ओळखून ठेवली होती. डी व्हॅलेरा हा तैलबुद्धीचा आणि उमद्या अंतःकरणाचा मुलगा आहे हे शाळेतील शिक्षकांनी त्यांना सांगावयास पाहिजे होते असे नव्हे. चार मंडळी जमली म्हणजे डी व्हॅलेरा स्तब्ध बसत असे हे जरी खरें, तरी ज्यांचा त्याला अधिक सहवास होई त्यांच्याशीं त्याला खूप बोलावयास हवे असे. हे ओळखूनच त्याची शाळा सुटली कीं, पैट्रिक कोल त्याला आपल्याबरोबर पुष्कळ वेळां फिरावयास नेत असत. मग नदीच्या तीरातीराने ते हिंडत आणि अशा वेळीं डी व्हॅलेरा नाना प्रकारच्या प्रश्नांनी आपल्या मामाला