१० डी व्हॅलेरा तो नेहमी मिसळे. मात्र जी भूमिका करतांना कमरेला म्यान लटकावून हातांत समशेर फिरविता येईल, किंवा कांहीं तरी पराक्रमाचा अभिनय करता येईल असली भूमिका निवडून काढून ती आपल्याकडे घेण्याचा त्याचा हट्ट असे, व त्याचे सवंगडी त्याचा तो हट्ट मोठ्या आनंदाने पुरवीतही असत. या वयांतीलच डी व्हॅलेरासंबंधींची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ही, की एखाद्या विशेष प्रसंगी देवळामध्ये धर्मोपदेशकाचे प्रवचन असले, की ते ऐकावयास तो मोठ्या आस्थेने व भक्तीने जात असे. त्या प्रवचनांच्या विषयांविषयीं त्याच्या अंतःकरणांत आदर असे, आणि धर्मोपदेशकाचे वक्तृत्वही त्याच्या मनाला फार आल्हाद देई. ही प्रवचनें ऐकून परत आल्यावर त्यांबद्दल डी व्हॅलेरा आपल्या सोबत्यांशीं वादविवाद करी, व त्या वादविवादांत त्याच्या अंगीं दिसून येणारे कौशल्य, ज्ञान, आणि सरलत्य पाहून त्याच्या सोबत्यांनाच नव्हे तर मोठ्या माणसांनाही आश्चर्य व कौतुक वाटल्यावांचून रहात नसे. असे सांगतात, कीं एके दिवशीं एक विद्वान् गृहस्थ आपल्या स्नेह्याबरोबर संभाषण करीत असतां पलीकडे खेळणा-या एका मुलाचा चेहरा त्यांना विशेष तेजःपुंज वाटला, व म्हणून त्याला त्यांनी जवळ बोलाविले. त्याचे नांव डी व्हॅलेरा आहे असे कळतांच त्या गृहस्थांना जरा आश्चर्य वाटले, कारण ते नांव विशेष प्रघातांतील नव्हते. अशा असाधारण नांवाच्या मुलाविषयी त्यांना अधिकच जिज्ञासा उत्पन्न झाली, व त्यांनी त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. डी व्हॅलेराने त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अशा कांहीं चतुराईने आणि तत्परतेने दिलें, की हा मुलगा पुढे मोठा कीर्तिमान होणार असे त्या गृहस्थांनीं त्या वेळी बोलून दाखविलें. अभ्यासाप्रमाणेच खेळही डी व्हॅलेराला प्रिय होते. नव्हे, खेळ , तालीम यांचे त्याला वेड होते असेच म्हणणे अधिक यथार्थ होईल.
पान:डी व्हँलरा.pdf/18
Appearance