पान:डी व्हँलरा.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकला मुलगा उत्तम प्रकारे तयार करूनच डी व्हॅलेरा स्वस्थ बसत नसे. वरच्या वर्गात शिक्षक काय शिकवितात हे पाहण्याच्या जिज्ञासेनें तो हळूच तेथे जाऊन बसे. कोणताही विषय असो, तो कळून घेण्याची डी व्हॅलेराला नेहमी उत्कंठा असावयाची ! पहिल्यापासून गणित विषयांत त्याची बुद्धि उत्तम प्रकारे चालत असे, व शेवटी शेवटीं तर त्याच्याहून वरच्या वर्गातील मुलांस गणित शिकविण्याचे काम शिक्षकांनी त्याकडे सोपवावे व ते त्याने हौसेने आणि दक्षतेने पार पाडावे असा क्रम चालू झाला होता. बारा वर्षांचा झाल्यापासून तर डी व्हॅलेरा फारच अभ्यासी झाला. संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला एखाद्या दगडावर किंवा झाडाच्या फांदीवर वाचीत असतांना तो दृष्टीस पडे. जेवावयाच्या वेळीही पुढे टेबलावर आपलें पुस्तक उघडून ठेवल्याखेरीज त्याला चैन पडत नसे. ज्यांत अद्भुत पराक्रमांची आणि साहसांची वर्णने आहेत असली पुस्तकें वाचण्याचा त्याला विशेष नाद असे. नेपोलिअनविषयांचे अनेक ग्रंथ त्याने वाचून काढले. साहसांच्या वर्णनांनी ओतप्रोत भरलेली अॅलेक्झेंडर ड्यूमसची “ तीन शिलेदार' (Three Musketeers )ही कादंबरी त्याच्या खास प्रीतींतील होती. त्याने ह्या कादंबरीची अनेक पारायणें केली होती व त्यांतील कित्येक प्रकरणेच्या प्रकरणें तो बिनचूक तोंडपाठ म्हणून दाखवी. आपल्या आवडीचे वाङ्मय तोंडपाठ करण्याची त्याला भारी हौस होती, व या बाबतीत त्याची स्मरणशक्तिही असाधारण होती. स्फुट लेख व निबंध लिहिण्याचाही त्याला बराच छंद होता, आणि एखादे पुस्तक वाचलें कीं त्यावरील आपले विचार निबंधरूपाने लिहून ठेवण्याची त्याला संवय होती. ग्रंथांतील सुंदर उतारे मोठ्याने वाचण्याची त्याला फार आवड असे, व ते तो वाचू लागला म्हणजे ऐकणाराच्या मनावर परिणाम झाल्यावांचून रहात नसे. त्याच्या बरोबरीचे विद्यार्थि छोटे छोटे नाट्यप्रयोग करीत त्यांत