पान:डी व्हँलरा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डी व्हॅलेरा व्हावयास लागली असे म्हणावयास कांहींच हरकत नाही. त्याचे पहिले पंतोजी जॉन केली हे होते. हे गृहस्थ बुद्धिमान होते. शिक्षकाच्या धंद्यांतच त्यांचे काळे केस पांढरे झाले होते, आणि लहान मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांची कळकळ आणि त्यांचे पवित्र वर्तन यांविषयी ते विख्यात होते. शिक्षणाविषयींच्या त्यांच्या कल्पना फार उच्च दर्जाच्या होत्या. ठराविक पुस्तकें शिकवून आणि इयत्तांच्या चाळणींतून गाळून काढून मुलाला तयार करूं पाहणे म्हणजे एखादा शर्यतीचा घोडा तयार करण्यासारखे आहे असे ते म्हणत, व असल्या कृत्रिम शिक्षणाचा ते मनापासून धिक्कार करीत. मुलांच्या अंतःकरणांतील नैतिक व धार्मिक नैसर्गिक भावनांना वळण देण्याविषयी ते फार दक्षता ठेवीत. व्यवहार व धर्म या दोहोंचेही उत्कृष्ट मीलन करून शिक्षण देण्याची त्यांची हातोटी मोठी कुशलतेची होती, आणि त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्याथ्यांवर त्यांच्या शिकवणीचा असा कांहीं एक कायमचा ठसा रहात असे, की इतर माणसांपेक्षां ते केव्हाही आपल्या वैशिष्ट्याने वेगळे दिसत. | डी व्हॅलेरा पहिल्या दिवशी शाळेत गेला तेव्हां त्याने मखमलीचा सुंदर पोषाख केला होता, व त्या पोषाखांत त्याचे मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तो वर्गात गेला तेव्हां शिक्षकाने त्याला त्याचे नांव विचारले. डी व्हॅलेराने ‘डी व्हॅलेरा' असे उत्तर दिले, पण त्या नांवाचा उच्चार शिक्षकाला कळेना. डी व्हॅलेराने पुन्हां दोन तीन वेळां आपलें नांव शक्य तितक्या स्पष्टपणे सांगितले तरी शिक्षकाला ते उमजेना. शेवटीं डी व्हॅलेराच्या घराजवळ राहणा-या एका विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याकडून शिक्षकाने डी व्हॅलेरा हे नांव लिहवून घेतले व मग ते हजिरीपटांत दाखल केले. दोन तीन वर्षांतच डी व्हॅलेराच्या असाधारण बुद्धीची साक्ष अनेक गोष्टींवरून पटू लागली. स्वत:च्या वर्गात शिकविले जाणारे धडे