पान:डी व्हँलरा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकला मुलगा दोघांनाही तो पसंत पडला. भावांची संमति मिळताच तिने इमॉनला आयलंडला पाठविण्याविषयी सर्व प्रकारची व्यवस्था केली. पतिवियोगाने आधीच कष्ट झालेल्या आपल्या अंतःकरणाला एकुलत्या एक मुलाचा विरह दुःसह होईल हे ती जाणून होती. परंतु इमॉनला आयर्लंडमध्ये पाठविण्यांतच त्याचे अतिम कल्याण आहे हे तिने पक्के ओळखले असल्यामुळे आपला दोन अडीच वर्षांचा लाडका मुलगा हातावेगळा करण्यास ती तयार झाली. अंतःकरण घट्ट करून वागण्याचीच ती वेळ होती, व त्याप्रमाणेच ती वागली. इमॉनचा मामा एडमंड कोल सुदृढ बांध्याचा, भव्य पुरुष होता. उंचीने तो सहा फुटांपेक्षा अधिकच होता. बहिणीच्या इच्छेप्रमाणे तो न्यू यॉर्क येथे आला व इमानला आपल्या ताब्यात घेऊन व इतर सारी तजवीज करून त्याने अमेरिका सोडली. त्याला काय माहीत, की आपण ज्या बालकाला उरापोटाशी धरून आयर्लंडला नेत आहोत तोच मोठेपणीं आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी समशेर उपसून इंग्लंडशीं झगडेल, किंवा तोच एका प्रसंगी इंग्लिश लष्करी कोर्टापुढे आरोपी म्हणून उभा राहून “ उद्या सकाळी सहा वाजतां तुला गोळी घालून ठार करण्यांत येईल?' असा त्याच्या अपराधाबद्दल निकाल सांगण्यांत येईल ? एक बाळसेदार सुंदर चुणचुणीत मुलगा आपण आपल्या भावाकडे नेत आहोत यापलीकडे एडमंडची कांहींच कल्पना असणे शक्य नव्हते. | सन १८८५ च्या एप्रिल महिन्याच्या २० तारखेला एडमंड इमॉनला घेऊन ब्रूरी येथे पोचला, व त्याने त्याला पॅट्रिक कोल याच्या स्वाधीन केले. एव्हांपासून पुढे इमॉनच्या संगोपनाचे व शिक्षणाचे सर्व काम पॅट्रिकच्या हातून झालें. इमॉन जरा मोठा झाल्याबरोबर त्याच्या मामाने त्याला ब्रूरी येथील ‘राष्ट्रीय शाळेत घातले. इमॉनची बुद्धि लोकविलक्षण होती असे म्हणतां आलें नाहीं तरी पहिल्यापासूनच त्याच्या बुद्धीची कुशाग्रता आणि अभ्यासाविषयी आवड दृग्गोचर