पान:डी व्हँलरा.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ डी व्हॅलेरा झटणा-या देशभक्तांचे अंतःकरण फार थोड्या लोकांना कळावयाचे, व त्यांनी आपल्या देहकष्टांनीं व आत्मत्यागाने तयार केलेल्या भूमिकेचा फायदा दुस-याच लोकांना मिळून अज्ञातवास, वनवास व बंदिवास याच गोष्टी यांच्या स्वतःच्या वाट्याला यावयाच्या, हा या निष्ठुर जगांतील वक्र राजकारणाचा नियमच आहे. आजपर्यंतच्या इतिहासाची साक्ष अशीच आहे. स्वातंत्र्यासाठी झगडणाच्या सर्व देशांचे इतिहास हेच सांगतात. पूर्वी इटलीत हेच झालें, आज हिंदुस्थानांतही हेच होत आहे आणि आयर्लंडांतही हेच होत असल्यास नवल नाहीं. इटलीला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मंझिनी व ग्यारीबाल्डी या दोघांनीं नाना संकटे सोसलीं, छळ सहन केला, आपल्या घरादाराची राखरांगोळी होऊ दिली. पण शेवटी त्यांच्या या स्वार्थत्यागामुळे इटलीला अर्धवट स्वातंत्र्य मिळू लागले तेव्हां मंझिनीच्या मनाला ते अपुरे वाटलें, क्या अध्र्या स्वातंत्र्याचा स्वीकार करण्यासाठी काव्हूर पुढे झाला, आणि एखाद्या हद्दपार झालेल्या इसमाप्रमाणे इंग्लंडमध्ये जाऊन राहून उरलेले आयुष्य कंठण्याची मॅझिनीवर पाळी आली ! हिंदुस्थानांतही संपूर्ण स्वराज्याचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवून झगडणारे लोकमान्य महात्मे तुरुंगांत खितपत पडत आहेत, आणि मुत्सद्यांची पिसे लावून मिरविणाच्या सन्माननीयांना त्यांच्या कार्याची फळे चाखावयास मिळत आहेत ! आयलैंडांतही असेच होत असल्यास नवल तें काय ? शेकडों वर्षे लढून थकलेल्या आयर्लंडची भूक फ्री-स्टेटवर भागली यांतही आश्चर्य नाही, आणि ‘स्वतंत्र राज्याच्या बंदिवासांत पडण्याचे दुर्भाग्य डी व्हलेराच्या वाट्याला आले यांतही आश्चर्य नाहीं ! मी आजपर्यंत कधींही स्वत:ला ब्रिटिश प्रजाजन म्हणवून घेतलें नाहीं, व तसे म्हणवून न घेतांच मी मरेन ! असे डी व्हॅलेराने अनेक वेळां बोलून दाखविले आहे. या त्याच्या उद्गारांत त्याच्या मनोभूमिकेचे सार आहे. डी व्हॅलेरा ‘स्वतंत्र राज्यांत'त कधीं