पान:डी व्हँलरा.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे-है १४७ डी व्हॅलेराच्या चरित्राचा शेवट कसाही होणार असो, त्याच्या आयुष्याचे सध्याचे दिवस मोठेसे स्पृहणीय नाहींत, येवढे खरे. १९२२ सालापासून ही व्हॅलेराच्या खडतर नशिबाला प्रारंभ झाला. आपला प्रजासत्ता पक्ष सांवरून धरण्यासाठी आपल्याच देशबांधवांशी लढण्यांत त्याचे काही दिवस गेले. पुढे त्याचे बहुतेक सहकारी मृत्युवश किंवा बंदिस्थ होऊन त्याचा पक्ष नामशेष झाल्यासारखा झाला, व अज्ञातवासांत दिवस काढण्याचा प्रसंग त्याच्या स्वतःवर आला, आणि आतां पुन्हां तो स्वतंत्र राज्याच्या तुरुंगांत खितपत पडला आहे ! डी व्हॅलेराचे चरित्र म्हणजे असाधारण धडाडी आणि असाधारण आत्मयज्ञ या दोन गुणांच्या पराकाष्ठेची हकीगत आहे. व्यावहारिक दृष्टीच्या मुत्सद्यांना डी व्हॅलेराचा आत्मयज्ञ व सत्याग्रह खुळेपणाचा वाटत असेल. पदरात पडलेल्या फायद्याकडे पाहून तत्त्वांची धरसोड करावयास तयार होणा-या पुढान्यांच्या हिशोबी मनाला डी व्हॅलेराचे एकंदर वर्तन आततायीपणाचे वाटत असेल. ध्येय हे केवळ सद्वस्तु म्हणून पुढे ठेवून त्याचा फक्त तोंडाने गौरव करावयाचा असतो, पण प्रत्यक्ष व्यवहारांत त्या ध्येयाच्या उंचीवरून खाली उतरूनच देशकार्य साधावयाचे असते, अशा विचारसरणीच्या मुत्सद्यांना डी व्हॅलेराचा मूर्खपणा केविलवाणी वाटत असेल. थोड्याच दिवसांपूर्वी ज्या डी व्हॅलेरावरून पंचप्राण ओवाळून टाकण्यास आयर्लंडांतील प्रत्येक स्त्री-पुरुषाची तयारी होती त्याच डी व्हॅलेराने तेरा महिने अज्ञातवासांत काढावे, व त्यानंतर पुन्हां ‘स्वतंत्र राज्याच्या कैदेत पडावे हा केवढा अधःपात, अशा विचाराने व्यवहार चतुर म्हणून मिरवणारे देशभक्त डी व्हॅलेराची कीवहीं करीत असतील. त्यांच्या दृष्टीला डी व्हॅलेराचे चरित्र एखाद्या शोकपर्यवसायी नाटकाप्रमाणे दिसत असेल. । परंतु डी व्हॅलेराची मनोभूमिकाच ज्यांना समजली नाहीं त्यांना असे वाटावे यांत आश्चर्य नाहीं. स्वर्गीय उच्च ध्येयाच्या सिद्धतेसाठीं