पान:डी व्हँलरा.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४९ पुढे—? सामील होईल हे संभवनीय नाहीं. ईश्वराच्या अतय लीलेने परिस्थितीची कांहीं विलक्षण उलटापालट झाली तर डी व्हॅलेरा बंधमुक्त होईल, त्याचा पक्ष पुनः बळावेल, फ्री-स्टेट उलथून पडेल, आयर्लंडचे व इंग्लंडचे पूर्वीचें युद्धही पुन्हा कदाचित् सुरू होईल, व शेवट आयलंडला पूर्ण स्वातंत्र्याचा लाभ होईल. किंवा कदाचित् सध्यांचीच परिस्थिति कायम राहून बंदिवासांतच जीवितयात्रा संपविण्याची डी व्हॅलेरावर पाळी येईल. किंवा निष्ठुर दैवाला आपल्या कठोरतेची साक्षच जगाला पटवावयाची असली तर स्वतंत्र राज्याकडून फांसाच्या फळीवरही डी व्हॅलेराला मृत्यु येईल. डी व्हॅलेराच्या लोकविलक्षण चरित्राचे शेवटचे प्रकरण कशा प्रकारचे लिहिण्याचा विधीचा हेतु आहे ते काय सांगावे ? इतके मात्र खास, की ते प्रकरण कसेही लिहिले गेले तरी आपल्या ध्येयाच्या आनंदांत गर्क असलेल्या डी व्हॅलेराला त्याचे सुखदुःख सारखेच ! या जगाच्या संसारांत पुढच्या घटकेला काय होईल हे देखील जर सांगता येत नाहीं तर डी व्हॅलेराचे चरित्र कसे संपेल ते काय सांगावे ? भविष्यकालाच्या खोल गुहेत इतका गडद अंधकार खचलेला आहे, की मानवी नेत्रांना त्या गुहेतील एकही वस्तु दिसत नाहीं. पुढे काय होईल या प्रश्नाचे उत्तर एकटा काळपुरुषच देऊ शकेल. पण तो ते उत्तर चटकन् देता नाहीं. वर्षानुवर्षे धीर धरावा तेव्हा त्याच्या उत्तराचे वाक्य पुरतेपण कानी पडते