पान:डी व्हँलरा.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ डी व्हॅलेरा सध्या कांहीं न करतां स्वस्थ बसणे हाच होणार ! अशा दुहेरी पेंचत ही व्हॅलेराचा पक्ष सध्यां सांपडलेला आहे. त्यांतून तो पक्ष कोणाचा मार्ग काढतो ते पाहणे आहे. इकडे डी व्हॅलेरा स्वतः फ्री-स्टेटच्या तुरुंगांत कैदी म्हणून डांबला गेला आहे. क्लेअरच्या निवडणुकीत तो यशस्वी झाला असल्यामुळे सरकारने त्याला आतां मुक्त केले पाहिजे असे पुष्कळांचे मत आहे. प्रेसिडेंट कॉसग्रेव्ह जिनेव्हाच्या परिषदेला जातांना वाटेंत लंडन येथे उतरला होता, त्या वेळीं डी व्हॅलेराच्या सुटकेसंबंध त्याला प्रश्न विचारण्यांत आला. तेव्हां तो म्हणाला, की डी व्हॅलेराला सोडावा किंवा नाहीं हैं नव्या डेलनेच ठरवावयाचे आहे. नव्या डेलच्या पहिल्या बैठकीतच डी व्हॅलेराच्या मुक्ततेचा ठराव आणण्याचा त्याच्या बाजूच्या सभासदांचा विचार आहे. पण मुक्ततेनंतर ‘स्वतंत्र राज्या'शी आपण सशस्त्र विरोध करणार नाही अशी हमी डी व्हॅलेराने दिली तरच त्याची मुक्तता होईल असे एकंदर परििस्थतीवरून वाटते. | काय होईल कांहीं सांगवत नाहीं. आज जवळ जवळ तीन महिन्यांत आयर्लंडविषयीं कांहींच बातमी कळेनाशी झाली आहे. लंडन येथे भरलेल्या साम्राज्यपरिषदेचा देखावा बाह्यतः मनोहर करण्यांत व परस्परांचे स्तुतिपाठ गाण्यांत साम्राज्यांतील • सर्व अधिकारी मुत्सद्दी गढून गेले असल्यामुळे, निरनिराळ्या देशांचे वैय्याक्तक राजकारण जणू कांहीं नामनेषच झाले आहे. आयलंडची परिस्थिति निवळून तिला जरा निश्चित स्वरूप आल्यावरच आयरिश धुरंधर डी व्हॅलेराच्या या चरित्राचे शेवटचे प्रकरण लिहिण्याची आमची फार इच्छा होती. परंतु कालाची इच्छा तशी दिसत नाही. या लोकविलक्षण धुरंधराच्या चरित्राचा उपसंहार कसा होईल याविषयीं नुसते तर्क करीतच लोकांनी बसावे अशी कालाची लहर आहे, व तिला लेखकाच्या लेखणीने प्रणाम केला पाहिजे.