पान:डी व्हँलरा.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे-? १४'५ फ्री-स्टेटवाले . . . ६३ प्रजासत्तावादी . . . ४४ स्वतंत्र पक्षाचे ... १६ मजूर पक्षाचे ... १५ शेतकरी पक्षाचे .. १५ डेल आयरेनमध्ये फ्री-स्टेट पक्षाचेच मताधिक्य कायम राहिलें ही गोष्ट यावरून उघड झाली. प्रजासत्ता पक्षाचे मताधिक्य झाले असते तर त्यांनी इंग्लंडशी झालेला तह अमान्य करूनच आपल्या नव्या राज्याला सुरवात केली असती हे जितकें खरें, तितकेच आतां डेलमध्ये फ्रीस्टेट पक्ष सर्वांत प्रबळ राहिल्यामुळे तो तह कायम होऊन ‘स्वतंत्र राज्याचा आज दोन वर्षे चाललेला कारभारच पुढे चालू राहणार हे खरे होते. तेव्हां तह फेकून देऊन स्वतंत्र राज्य' नाहींसें करण्याच्या प्रजासत्ता पक्षाच्या महत्त्वाकांक्षेला या निवडणुकीनें वाव ठेवला नाहीं इतकें खास. अर्थात् प्रजासत्ता पक्षाच्या डोळ्यांपुढे यापुढचा प्रश्न उभा राहिला तो हा, की आपलें आज बहुमत नाही म्हणून डेलमधील जागा आपण अजीबात सोडून द्यावयाच्या, की मजूर व शेतकरी पक्षांशी सहकार्य करून स्वतंत्र राज्याच्या कारभारांत आपल्या पक्षाला प्रबळ ‘विरोधी पक्षाचे स्वरूप द्यावयाचे ? ‘विरोधी पक्ष या नात्याने डेल आयरेनमध्ये बसण्याचा बेत प्रजासत्तावादी लोकांना एकदम मान्य होण्यासारखा नाही. कारण डेलमध्ये बसावयाचे म्हणजे ‘स्वतंत्र राज्याच्या घटनेत ठरलेली राजनिष्ठेची शपथ घेतली पाहिजे; व या शपथेविरुद्ध तर डी व्हॅलेरा पहिल्यापासून झगडला ! डेलमधील आपापल्या जागा सोडून देऊन बाहेर रहावयाचे म्हटले तरी प्रजासत्तावादी पक्षाला तेही फारसे रुचण्यासारखे नाहीं. कारण ‘स्वतंत्र राज्या'ला सशस्त्र विरोध करण्याची आज अंगांत शक्ति नसल्यामुळे डेल बाहेर प्रजासत्ता पक्षाने राहणे याचा अर्थ त्या पक्षाने डी...१०