प्रकरण अकरावें पुढे–१ अखेर एकदांच्या निवडणुकी झाल्या. कांहीं ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रसंगाही विरोधीपक्षांत मारामाच्या झाल्या. डी व्हॅलेराला पकडल्यानंतर प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष झालेले रूटलेज हे बलिना परगण्यातर्फे निवडून आले. त्या यशाच्या उत्सवासाठी शेंकडों प्रजासत्तावादी बलिनाच्या किल्लयांत गोळा होऊन गाऊं नाचू लागले व उत्साहाच्या भरांत त्यांनी मोठमोठ्या आगट्याही पेटविल्या. हे पाहतांच किलाली येथील ठाण्यावरील फ्री-स्ट च्या सैन्याने त्यांजवर चाल केली, बरीच मोठी चकमक उडाली, व कांहीं लोक मृत्यु पावले. अशीच एक झटापट लिमेरिक परगण्यांत कॅसल कॉनेल येथे झाल्याचे फ्रीस्टेटने जाहीर केले. रूटलेजप्रमाणेच प्रजासत्तापक्षाचा प्रसिद्ध पुढारी काउंट प्लंकेट हाही निवडून आला. स्वतः डी व्हलेरास तर निवडणुकीत अपूर्व यश मिळाले. तो तुरुंगांत होता तरी त्याचे भक्त त्याला विसरले नव्हते. उलट सध्यांच्या त्याच्या बंदिवासामुळे लोकमताचा ओढा त्याच्याकडे अधिकच वळला होता. तो आपल्या प्रिय क्लेअर परगण्यांतून निवडणुकीस उभा राहिला होता. त्याच्याविरुद्ध फ्री-स्टेटतर्फे मैकनील हा त्या परगण्यांतून उमेदवार होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत क्लेअर परगण्याने आपली डी व्हॅलराविषयीची निस्सीम प्रीति व फ्री-स्टेटविषयीची उपेक्षाबुद्धि सान्या देशाच्या निदर्शनास आणून दिली. मॅक्नीलला अवघी ८१९६ व डी व्हॅलेरास १७७६२ मते मिळाली आणि डी व्हॅलेराच्या बाजूला आज देश नाहीं असे म्हणणान्यांची तोंडे केअर परगण्याने चांगलीच बंद केली. । निवडणुकीचा सबंध निकाल जाहीर झाला त्या वेळीं डेलमध्ये निरनिराळ्या पक्षांचे पुढे दिल्याप्रमाणे संख्याबल झाल्याचे दिसून आले.
पान:डी व्हँलरा.pdf/152
Appearance