पान:डी व्हँलरा.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्री-स्टेटचा कैदी १४३ आपल्या कामाला लागली. सरकार पक्षाचे उमेदवारही आपल्या प्रयत्नांची शिकस्त करण्यास पुढे सरसावले, व मजूर पक्ष, शेतकरी पक्ष, वगैरे उदयोन्मुख पक्षही निवडणुकीत यश मिळविण्यासाठी अंग झाडून कामाला लागले. अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यांतील या निवडणुकींना विलक्षण रंग चढला. या नव्या निवडणुकीचे महत्त्व विशेष होते यांत संशय नाहीं. हेल आयरेनच्या एकंदर सभासदांची संख्या १५३ असते. या १५३ सभासदांमध्ये निवडणुकीच्या जोरावर प्रजासत्तावाद्यांचे मताधिक्य झालें तर नवी बनणारी डेल आयरेन तहाला सर्वस्वी विरुद्ध अशा मताची होणार, व सुमारे दोन वर्षांपूर्वी जो तह होऊन आयलंडचे स्वतंत्रराज्य'-Free state-अस्तित्वात आले, तो तह कागदाच्या चिटोन्याप्रमाणे समजून स्वतंत्र राज्य मोडून टाकण्याचेच काम ती डेल प्रथम करणार ही गोष्ट उघड होती. त्यामुळे या नव्या निवडणुकी म्हणजे एक ' जगावयाच की मरावयाचे असाच प्रश्न होय असे ‘स्वतंत्र राज्याच्या पक्षपात्यांना वाटत होते, व या निवडणुकींवरूनच आपल्या पक्षाच्या नशिबाचा काय तो सोक्षमोक्ष लागणार ही गोष्ट प्रजासत्तावालेही पुरतेपणी जाणून होते. अर्थात् यशाचा प्रयत्न दोन्ही पक्ष चढाओढीने करू लागले. सारे उमेदवार व्याख्याने झोडण्यांत गुंग होऊन राहिले. असल्या व्याख्यानांच्या प्रसंगी कांहीं ठिकाणी थोड्याबहुत मारामाच्याही होऊ लागल्या. सर्व पक्षांचा उत्साह व आवेश कळसास पोंचल्यासारखे झालें !