पान:डी व्हँलरा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ डी व्हॅलेरा। ण्याची बिकट जबाबदारी एकटच्या अंगावर पडलेली पाहून अधिकच काळजी वाटू लागली. न्यू यॉर्कसारख्या शहरी कुटुंबाचा पोसता पुरुष नाहींसा होणे म्हणजे कांहीं लहान सहान संकट नव्हे. त्या संकटाच्या भाराखालीं डी व्हॅलेराच्या आईचा धीर दडपून गेला असल्यास नवल नाहीं. तिची स्थिति साधारण बरी असली तरी ती श्रीमंत होती असेही म्हणतां आलें नसते. स्वतःचा उदारनिर्वाह करून मुलाचे संगोपन व शिक्षण चालविण्याचा प्रश्न आज नाहीं तरी काही दिवसांनी | जरा बिकटचं होण्याचा संभव तिला दिसावा हे साहजिक होते. ती बुद्धीची आणि धीराची बाई होती, त्यामुळे खटपट करून स्वतःला काम मिळविण्यांत तिला फारसे श्रम करावे लागले नाहींत. पण आपण कामावर गेलो, की मुलाला कोण संभाळणार ? हा प्रश्न सोडविणे तिला दुरापास्तच वाटू लागले. कितीही विचार केला तरी त्या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी ते तिला सुचेना. शेवटी एके दिवशीं याच प्रश्नाचा विचार करीत ती सचिंत बसली असतां तिचा भाऊ एडमंड याजकडून तिला एक पत्र आले. तिच्या या भावाला कनेक्टिकटमध्ये नोकरी होती. त्याला मलेरिआ जड़ला होता व हवापालट करण्यासाठी आयलंडमध्ये जाण्याविषयी डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला होता. म्हणून आपण आयलंडला जाणार आहोत असे बहिणीस कळविण्यासाठी हें पत्र त्याने लिहिले होते. एडमंडचे ते पत्र वाचतांच इमॉनला त्याच्या बरोबर आयर्लंडमध्ये पाठविण्याची कल्पना त्याच्या आईच्या मनांत आली. तिची आई एलिझाबेथ–म्हणजे इमॉनची आजी-अजून जिवंत होती; व तिचा दुसरा भाऊ पॅट्रिक हा ब्रूरी गांवामध्ये नॉकमूर येथे आईबरोबर घर करून राहिलेला होता. इमॉनला तिकडे पाठवून दिल्यास मामाच्या नजरेखालीं आणि आजीच्या प्रेमळ जोपासनेने त्याचे शिक्षण व संगोपन उत्तम प्रकारे होईल असे इमॉनच्या आईला वाटले. तिने आपला विचार आपल्या दोन्ही भावांना ताबडतोब कळविला, व त्या