पान:डी व्हँलरा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्री-स्टेटचा कैदी १११ वेळीं उघडपणे तुमच्यांत येऊन मिसळणे व आमचे म्हणणे काय ते तुम्हांला नीट उलगडून सांगणे शक्य नव्हते. त्या काळीं आमच्या अडचणीचा फायदा घेऊन आमचे शत्रू तुम्हांला असे सांगत होते, कीं केवळ विनाशक कार्य करण्याचाच आमचा अट्टाहास आहे. एका भावाने दुसन्या भावावर शस्त्र चालवावे असे मी आजन्मांत कधीही प्रतिपादन केलेले नाही. एका पक्षाला दुसन्या पक्षाविरुद्ध लढावयास लावून आपण आपला फायदा करून घ्यावयाचा हा आमच्या शत्रूचा ठरलेला डाव आहे, व त्या डावाचा उपयोग करण्याचे माझ्या मनांत कधीही आलें नाहीं, व येणे शक्य नाही. अगदी प्रारंभापासून मी एकाच पवित्र तत्त्वाचे प्रतिपादन केलेले आहे. ते पवित्र तत्त्व सांगण्यासाठीच आज पुन्हां मी तुमच्यापुढे उभा राहिलो आहे| डी व्हॅलेराचे एवढेच भाषण सर्व लोकांना नीट ऐकू आले. पुढे तो बोलत होता इतक्यांत आतांपर्यंत इकडे तिकडे रेंगाळणारे फ्री-स्टेटचे शिपाई हळूहळू शिस्तवार रांगेत जमा झालेले लोकांनी पाहिले. अल्पावक शांतच त्या शिपायांनी व्यार पठाभोंवतीं गराडा घातला. त्याबरोबर 4 डी व्हॅलेकी जय !! * रिपब्लिककी जय ! ' असा जयथोष करण्यास लोकांनी प्रारंभ केला. तशा त्या दंगलींतही डी व्हॅलेराने आपले भाषण चालूच ठेवले होते. लोकांनी जयघोष सुरू करतांच त्या हत्यारबंद शिपायांनी आपल्या बंदुका वर उचलल्या, आणि गोळ्या हवेत उडतील अशा बेताने एक फेर झाडली. त्याबरोबर जिकडे तिकडे एकच गोंधळ उडाला. लोक सैरावैरा धांवले, बायकांनी किंकाळ्या फोडल्या व कांहीं स्त्रिया मूच्छित होऊन तेथेच धरणीवर पडल्या, आणि लहान लहान बालकें सशसारखी वाट सांपडेल तिकडे रडत ओरडत पळाली. तितक्यांत डी व्हॅलेराही खाली पडलेला लोकांनी पाहिला, व तो गोळीबाराला बळी पडला अशा समजुतीने सर्वांनी एकच हाहाःकार केला. पळून गेलेले सारे लोक बाजारचौकांत जमले