पान:डी व्हँलरा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० डी व्हॅलेरा पिस्तुलांनीं भारावल्यासारखे जड दिसत होते. सभास्थानी जमणाच्या माणसांना ते सैनिक नाना प्रकारचे प्रश्नही विचारीत होते. कोणी म्हणे डी व्हॅलेरा येणारच नाही, असे प्रगट होऊन मरण ओढवून घेण्याइतका तो मूर्ख नाहीं; कोणी म्हणे, आज या सभास्थानीं प्रगट होण्याची त्याची छातीच नाहीं; तर कोणी म्हणे, आज डी व्हॅलेरा प्रगट होणार, त्याच्या पक्षाचे सारे सैनिक गोळा होऊन भयंकर युद्ध होणार, आणि फ्री-स्टेट आज उलथून पडणार ! अशा प्रकारे नाना प्रकारचे तर्कवितर्क करीत लोक सभास्थानी जमत होते, आणि सभेची वेळ जवळ येत चालल्यामुळे सर्वांची अधीरता अतिशय अनावर होत च लली होती. | शेवटी दोन वाजण्याच्या सुमारास एक लहानशी मोटार सभास्थानाकडे येतांना लोकांना दिसू लागली. त्यांत डी व्हॅलेराला पाहतांच * तो पहा डी व्हॅलेरा ! ' अशी एकच आरोळी साया लोकांमधून उठली. डी व्हॅलेराने अंगावर एक जांभळा ओव्हरकोट घातला होता, डोक्याला करड्या रंगाची टोपी घातली होती, आणि हातांत एक काठी धरली होती. त्याची मोटार सभास्थानीं येऊन पोचतांच तीतून तो खाली उतरला. त्याच्या चेह-यावर पूर्वीची कांती दिसत नव्हती, आणि त्या क्षण त्याच्या अंतःकरणाची खळबळ उडाली असावी असे त्याच्या मुद्रवरून वाटत होते. डी व्हॅलेरा व्यासपीठावर चढल्याबरोबर सर्वांनी आनंदाने आरोळ्या मारून त्याचे स्वागत केले, व कांहीं वेळ सभास्थानचा तो प्रचंड जनसमूह हर्षाने वेडावल्यासारखा दिसला. थोड्या वेळाने सभेच्या कामाला प्रारंभ होऊन दोन तीन वक्त्यांनी * आमच्या प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्ष आज आमच्यांत परत आलेला पाहून आम्हां सर्वांना परमानंद होत आहे' असे उद्गार काढून डी व्हॅलेराचा गौरव केला. नंतर डी व्हॅलेरा बोलावयास उठला. त्या वेळीं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि आनंदाच्या बेहोष आरोळ्या यांनी वातावरण दुमदुमून गेलें. डी व्हॅलेरा म्हणाला, “ दुर्दैवाने कांहीं काळ असा गेला, की त्या