पान:डी व्हँलरा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। । । । " फ्री-स्टेटचा कैदी १३९ स्वतः उमेदवार म्हणून उभा राहणार आहे, व त्या वेळी आमचा पक्ष विजयी झाल्यावर फ्री-स्टेटला आमची लोकप्रियता नीट कळेल. | डी व्हॅलेराचे हे प्रत्युत्तर जाहीर होतांच आयर्लंडमध्ये मोठी खळबळ उडाली. डी व्हॅलेरा पुन्हां प्रगट होणार हे समजताच त्याच्या इमानी अनुयायांना अत्यानंद झाला. ज्यांच्या प्रजासत्तावादित्वावर फ्री-स्टेटच्या अंमलामुळे थोडीशी धूळ चढली होती त्यांचा मूळचा अभिमान पुन्हां जागृत झाला व निवडणुकीमध्ये डी व्हॅलेराच्या पक्षाला मनोभावें साह्य करण्यासाठी ते पुढे सरसावले. फ्री-स्टेटच्या पक्षांतील लोकांना डी व्हॅलेराचे प्रगट होणे हे एखाद्या मोठ्या संकटासारखेच वाटू लागले. आणि डी व्हॅलेरा प्रगट झाल्याबरोबर फ्री-स्टेट त्याला पकडून फांशी देईल की काय अशी घोर शंकाही अनेक लोकांच्या मनांत डोकावू लागली. एकीकडे लोकांच्या मनांत अशा प्रकारे निरनिराळ्या विचारांची खळबळ उडाली असतांना, निवडणुकीसाठीं प्रगट होण्याचा आपला बेत निर्भयपणे पार पाडण्याचे डी व्हॅलेराने अगदीं पक्के ठरविलें इतकेच नव्हे, तर ता. १५ ऑगस्ट रोजी दुपारीं क्लेअर परगण्यांतील एनिस गांवीं जी जाहीर सभा होईल त्या सभेत डी व्हॅलेरा प्रगट होईल व भाषण करील, अशीही बातमी त्याने प्रसिद्ध करविली. त्यामुळे डी व्हॅलेराचे शत्रु व मित्र १५ तारखेची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहू लागले. शेवटी ती १५ तारीख उजाडली ! त्या दिवशीं एनिस गांवीं 'लेडी डे" नांवाचा कसलासा सण होता. सभेची वेळ दुपारी एक वाजता म्हणून जाहीर झाली होती. पण लोक सकाळपासून सभास्थानी गर्दी करू लागले. लोकांत हजार प्रकारच्या गप्पा उठल्या होत्या. डी व्हॅलेराला गिरफदार करणार अशी अगदी दाट वदंता होती; आणि फ्रीस्टेटचे बरेचसे सैनिक ठिकठिकाणी उभे राहिलेले पाहून ती बातमी लोकांना अधिकच खरी वाटू लागली. फ्री-स्टेटच्या सैनिकांचे खिसे