पान:डी व्हँलरा.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ डी व्हॅलेरा अशा परिस्थितीत १९२३ चे जून व जुलई हे दोन महिने उगवले व मावळले. आतां डेल आयरेनची मुदत संपत आली होती व नव्या डेल आयरेनसाठी नव्या निवडणुकी होण्याची वेळ जवळ येत चालली होती. आपल्या फ्री-स्टेट पक्षाला आयरिश लोकमताचा, पूर्ण पाठिंबा आहे व डी व्हॅलेराचा पक्ष उचलून धरावयास राष्ट्रतील, फारच थोडी माणसे तयार आहेत अशी प्रेसिडेंट कासग्रेव्ह याची समजूत होती. डी व्हॅलेराला पकडण्याचे आपले सर्व प्रयत्न फसल्याबद्दल मनांतल्या मनांत वाटणारा विषाद लपविण्यासाठी आणि सामान्य जनतेवर छाप मारण्यासाठी, अशा दोन हेतूनी प्रेसिडेंट कॉसग्रेड यांनी या वेळीं डी व्हॅलेराला असे जाहीर आव्हान दिले, की “ तुम्ही असे. लपून बसतां यांत काय पुरुषार्थ आहे ? आयलंड देश तुमच्या बाजूचा आहे अशी तुम्ही नेहमीं बढाई मारतां. ती खरी करून दाखवावयाची. असेल तर ही लपालप सोडून प्रगट व्हा व आतां नव्या निवडणुकी होणार आहेत त्यांत उभे रहा ! " . कासग्रेव्हला वाटले होते, की या जाहीर आव्हानाला डी व्हॅलेराकडून कांहीं उत्तर मिळावयाचे नाही व तो तसाच अज्ञातवासांत दिवस काढीत राहील, असे झाले म्हणजे १६ बघा हा पळपुटा डी, व्हॅलेरा ! आपल्या पक्षाची लोकप्रियता सिद्ध करण्याची संधि आम्ही. त्याला देत असून तो पुढे येत नाहीं ! यावरून त्याला आज देशांत, कांहीं मान्यता नाहीं हे सिद्ध होत नाहीं काय ? असा ओरडा, आपल्याला करता येईल, अशी कॉसग्रेव्ह यांची कल्पना होती. असा, कावा मनांत याजूनच त्यांनी तो डॉव टाकला होता यांत शंका नाहीं. पण डी व्हॅलेराशीं कावेबाजीचा खेळ खेळणे सोपे नव्हते. कॉसग्रेव्ह. यांनी डी व्हॅलेराला नीट अजमावला नव्हता हेच खरे. कासग्रेव्हचे ते आव्हान जाहीर होतांच डी व्हॅलेराने त्याला असे जाहीर प्रत्युत्तर पाठविलें, कीं येत्या निवडणुकीत केवळ आमचा पक्षच नव्हे तर मी