पान:डी व्हँलरा.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावें फ्री-स्टेटचा कैदी ! आतां डी व्हॅलेराच्या पक्षाला पुरते ग्रहण लागल्यासारखे झाले होते. त्याच्या पक्षाच्या सैनिकांनी त्याच्याच हुकुमावरून शस्त्रास्त्रे कशीं खाली ठेवली ते मागच्या प्रकरणांत सांगितलेच आहे. या सुमारास डी व्हॅलेराचे १३००० अनुयायी फ्री-स्टेटच्या तुरुंगांत कैदी म्हणून डांबले गेले होते, व सहस्रावधि प्रजासत्तावाद्यांनी मायभूमीचा त्याग करून अमेरिकेस प्रयाण केले होते, यावरून डी व्हॅलेराच्या पक्षाला कसे दुर्दिन आले होते याची वाचकांस चांगली कल्पना येईल. डी व्हॅलेराचे बहुतेक प्रमुख सहकारी शूर पुरुष गतप्राण किंवा बंदिवासी झाले होते. प्रत्यक्ष डी व्हॅलेराच्याही प्राणावर फ्री-स्टेटचे सैनिक टपले होते. मोटारी, विमाने यांचाही उपयोग करून व वाटेल ते बरे वाईट उपाय योजून डी व्हॅलेराला पकडण्याची शिकस्त करण्याचे फ्री-स्टेटने ठरविले होते. मूठभर स्वपक्षीयांबरोबर पहाडांत व जंगलांत लपून छपून दिवस कंठण्याचा प्रसंग डी व्हॅलेरावर आला होता, आयरिश जनतेत त्याच्याविषयी पूर्वीची निस्सीम भक्ति उरलेली नव्हती, त्याचेच देशबांधव फ्री-स्टेटची सत्ता मान्य करून त्याच्या जिवावर उठले होते, आणि इंग्लंडांतील साम्राज्यवादी उर्मट वर्तमानपत्रे तर डी व्हॅलेराला पकडून एकदम तोफेच्या तोंड द्यावा असा फ्री-स्टेटला उपदेश करीत होती. अशा प्रकारे वैराचे काहूर चहू बाजूस माजलेले असतांना निराधार व विपन्न स्थितीतही आपण आतां कोणते धोरण स्वीकारावे याचा विचार करीत डी व्हॅले। आनंदाने दिवस काढीत होता, व नवलाची गोष्ट ही, की त्याला पकडण्यासाठी फ्री-स्टेटचे भगीरथ प्रयत्न चालू असूनही त्यांचे प्रयत्न विफल करून डी व्हॅलेराने आपले स्वातंत्र्य कायम ठेवले होते.