पान:डी व्हँलरा.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ डी व्हॅलेरा सत्ताक पक्ष जेव्हा पुन्हां त्यांना हाक मारील तेव्हा त्याच्या झेंड्याभोंवतीं नव्या दमाने गोळा व्हावें. | अज्ञातवासाच्या वेळीं विराटाच्या नगरीत प्रवेश करण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रास्त्रे व कवचकुंडलें शमीवृक्षावर लपवून ठेवलीं, त्याप्रमाणे डी व्हॅलेराचा हा हुकूम मान्य करून प्रजासत्तावाद्यांनी आपल्या शस्त्रांचे विसर्जन केले. या शस्त्रविसर्जनाच्या वेळीं पांडवांप्रमाणेच त्यांच्याही मनाला परम दुःख झाले असेल. आपला अज्ञातवास संपल्यानंतर आपली प्रिय शस्त्रास्त्रे आपल्याला पुन्हां धारण करतां येतील अशा आशेच्या आधारावर पांडवांनी आपले दुःख गिळले, त्याप्रमाणेच प्रजासत्तावाद्यांनी आपले कष्टी मन आंवरून धरले असेल, व जें अपरिहार्य त्याच्यापुढे मान वांकविलीच पाहिजे अशा विवेकानें डी व्हॅलेराची आज्ञा मान्य केली असेल. पण पांडवांचा अज्ञातवास संपला त्याप्रमाणे या देशभक्तांचा अज्ञातवास संपणार होता काय?