पान:डी व्हँलरा.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शमी वृक्षावर शस्त्रविसर्जन १३५ द्यावी. पुढे कासग्रेव्हनें ही अट जरा सौम्य केली व असे म्हटले, की प्रजासत्तावाद्यांनी हत्यारें फ्री-स्टेटच्या ताब्यात देण्याऐवजी आपापल्या गांवच्या धर्माधिका-यांच्या रखवालींत ठेवली तरी चालेल. परंतु ही अट देखील डी व्हॅलेराने मान्य केली नाही. त्याचे म्हणणे असे होते, कीं नव्या निवडणुकी होईपर्यंत कोणी कोणावर शस्त्र चालवू नये, आणि, हत्यारांवर ताबाच रहावयाचा तर प्रजासत्तावाद्यांप्रमाणे फ्री-स्टेटवाल्यांच्या, हातांतील हत्यारांवरही तो राहिला पाहिजे. याप्रमाणे प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर कॉसग्रेव्ह व डी व्हॅलेरा यांचा, तीव्र मतमेद होत गेल्यामुळे मे महिनाभर सुरू असलेले समेटाचे सर्व प्रयत्न अखेरीस निष्फल ठरले, आणि शेवटी मे महिन्याच्या तिस-या , आठवड्यांत आयरिश पार्लमेंटच्या भरसभेत कॉसग्रेव्हनें अध्यक्ष या : नात्याने जाहीर केले, की डी व्हॅलेराचा व आमचा समेट होणे शक्य नाहीं. डी व्हॅलेसने एकीकडे कॉसग्रेव्हशीं समेट न करण्यांत आपल्या तत्त्वांची निष्ठा कायम ठेवली, व दुसरीकडे सध्यांच्या परिस्थितीत आपल्या पक्षाने फ्री-स्टेटशीं उघड युद्ध चालू ठेवण्यांत व्यर्थ प्राणहानि व रक्तपात होईल हे जाणून आपल्या हातांतील शस्त्रास्त्रांना कांहीं काल अज्ञातवासांत विश्रांति देण्याविषयी आपल्या अनुयायांना हुकूम सोडला. डी व्हॅलेने मे महिन्याच्या २४ तारखेस हा हुकूम काढला. त्यांत असे म्हटले होते, कीं फ्री-स्टेटचा सशस्त्र प्रतिकार करण्याचे धोरण सध्या सोडून दिले पाहिजे. फ्री-स्टेट नाहींसें करून प्रजासत्ताक राज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या प्राणांचे व्यर्थ बळी देणे हे सध्यांच्या परिस्थितींत सूज्ञपणाचे होणार नाही. त्यासाठी आता आपल्याला निराळ्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे.हत्यारें खाली ठेवणे हेच आजच्या घटकेला देशाभिमानाचे कृत्य होईल. मात्र हत्यारे शत्रूच्या स्वाधीन करावयाचीं नाहींत. प्रजासत्तावादी सैनिकांनी आपापली शस्त्रसामग्री कोठे तरी गुप्त स्थळीं ठेवावी, व कांहीं दिवस विश्रांति घेऊन प्रजा