पान:डी व्हँलरा.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ डी व्हॅलेरा करावयास तो आतां तयार होईल. लढाई तहकूब केल्याचा हुकूम आपल्या पक्षांतील लोकांना दिल्यानंतर तीन दिवसांनी अँड्यू जेम्सन व जेम्स, डग्लस या दोन फ्री-स्टेटच्या सभासदांना डी व्हॅलेराने निरोप पाठवून कळविलें, कीं समेटाची चर्चा करण्यासाठी तुमची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे त्या दोघांनी डी व्हॅलेराघी गांठ घेतली, व त्यांच्या मध्यस्थीनें फ्री-स्टेटचा अध्यक्ष कॉसग्रेव्ह व डी व्हॅलेरा यांच्यामध्ये सुमारे सबंद मे महिनाभर पंत्रव्यवहार चालला होता. कॉसग्रेव्ह आणि डी व्हॅलेरा यांनी एकमेकांस पाठविलेल्या खलित्यांवरून असे दिसते, कीं समेटाच्या मूलभूत तत्त्वांवषय आणि अटींविषयीच त्या दोघांचा मतभेद होता. कॉसग्रेव्हचे पहिले तत्त्व हे होते, कीं इंग्लंडआयर्लंडमध्ये झालेल्या ज्या तहाच्या अन्वयें फ्री-स्टेट अस्तित्वात आलें तो तह सर्वस्वी मान्य समजण्यांत आलाच पाहिजे. उलट, डी व्हॅलेराचे पहिले तत्त्व हे होते, की त्या तहार आयरिश जनतेची मते केव्हाही घेतली गेली नसल्यामुळे तो तंह आयर्लंडने मान्य केला किंवा नाही या प्रश्नाचा निकाल अजून लागावयाचा आहे, व तो लावून घेण्यासाठीं अखिल जनतेच्या मतांची मजदाद प्रथम केली पाहिजे. कासग्रेव्हचा दुसरा मुख्य मुद्दा असा होता, की आयरिश पामेंटच्या प्रत्येक सभासदाने इंग्लंडच्या तक्ताविषयी राजनिष्ठेची शपथ घेण्याचे जे कलम त्या तहामध्ये आहे ते मान्य करावे. डी व्हॅलेराचा या शपथेविरुद्ध तर पहिल्यापासून कटाक्ष होता. त्याने काग्रेव्हपुढे अशी एक सूचना मांडली, की ही राजनिष्ठेची शपथ घेणे नं घेणे हे प्रत्येक सभासदाच्या इच्छेवर अवलंबून ठेवावे. पण डीं व्हॅलेराची ही सूचना कॉसग्रेव्हला रुचणे शक्यच नव्हते. याखेरीज कासग्रेव्हनें एक अट घातली ती अशी, कीं समेट झाल्यानंतर नवीन निवडणुकी होऊन नव्या सरकारची घटना होईपर्यंत सर्व प्रजासत्ताबाद्यांनी आपल्या जवळची हत्यारे व युद्धसामग्री फ्री-स्टेटच्या रखवालींत